– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 25 :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्राकृतिक नैसर्गिक सेंद्रिय, गांडूळखत पद्धतीने शेती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी यांनी तालुक्यातील कडोली ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिनाच्या पर्वावर आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रंनाळ्याच्या संयोजिका राजयोगी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले , कढोली ग्रामपंचायत च्या सरपंच प्रांजल वाघ, कामठी पंचायत समिती माजी सभापती सेवक उईके, पत्रकार सुदाम राखडे, वंदना दीदी ,शीलू दीदी ,माजी सरपंच नानूताई ठाकरे, सुरेश हटवार उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजयोगिनी प्रेम लतादीदी म्हणाल्या भारत हा कृषिप्रधान देश असून स्पर्धेच्या युगात शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी याकरिता शेतकरी रासायनिक व कीटकनाशक औषधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहेत त्यामुळे अण्णा, पिकण्याची पोषकता कमी झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये विविध रोगाचे प्रमाण वाढलयाचे दिसून येत आहेत विविध रोगमुक्त पीक अन्न निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राकृतिक ,नैसर्गिक, सेद्रीय ,गांडूळ खताचा उपयोग करून अन्नधान्याची पोषकता गुणवत्ता उत्तम निर्माण होईल याकरिता प्रायोगिक तत्वावर शेती करण्याचे आव्हान केले नैसर्गिक शेतीमध्ये निर्माण झालेल्या अण्णा मध्ये मोठ्याप्रमाणात गुणवत्ता व पोषकता असल्याने विविध विकारापासून मुक्तता प्राप्त होत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदा दीदी यांनी केले संचालन वंदना दीदी यांनी केले व आभार प्रदर्शन चंद्रकला दीदी यांनी मांनले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी देखा दीदी, रीना जुमडे, नानूताई ठाकरे, सुरेश हटवार आदींनी परिश्रम घेतले कार्य क्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित