यवतमाळ :- गेल्या दहा दिवसापासून घरगुती घरी विराजमान असलेल्या बापाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आवारणी करीत मोठ्यासह लहानग्यांनी बापाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे.
सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळासह घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले अशातच यवतमाळ शहरात अनेक नागरिकांच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली दररोज वेगवेगळे कार्यक्रमाने शहरासह जिल्ह्यात भक्तीमय वातावरण होते अशातच गणेश भक्तांनी अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात बाप्पाची पूजा अर्चना केली यवतमाळ शहरात दहाव्या दिवशी व अकरावा दिवस म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बापाला निरोप देण्यात आला गणपती बाप्पा लवकर या… अशी साद घालत यवतमाळकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद आबालवृद्धांसहबाळ गोपालांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
यवतमाळ नगरपालिकेने शहरात कृत्रिम टाक्याची निर्मिती गणपती विसर्जन करण्यासाठी केली होती मात्र या कृत्रिम टाक्यात एक ते दीड फूट गणपती विसर्जन करण्यात आले मात्र शहरातील आर्णी मार्गावरील वडगाव परिसरात नगरपालिकेने एकही वीर स्वच्छ न केल्यामुळे 2 फुटाच्या वर असलेली गणेश मूर्ती घरगुती गणपतीसह मंडळातील मोठे गणपती विसर्जन कुठे करायचा असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला असून अनेक नागरिकांनी वडगाव मधून यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरातील विहिरीत गणरायाचे विसर्जन केले त्यामुळे नगरपालिकेने वडगाव परिसरातील अनेक नगरातील विहिरी स्वच्छ न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.