नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन येथे कार्यरत NDS पथकातील जवान आनंदराव आत्राम यांचे दिनांक 21 मे, 2022 ला ह़दयविकाराणे निधन झाले. पथकाचे प्रमुख विरसेन तांबे व सहायकांनी आनंद आत्राम हयांचे घरी जाऊन कुटूबियांचे सांत्वन केले व 1,00,000/- एक लक्ष रुपयाची आर्थिक मदत केली.
यावेळी झोन लिडर संजय खण्डारे, प्रविण लोखंडे, पवन डोंगरे, नरहरी भिरकड, नथ्थु खांडेकर, प्रशांत राऊत, सुधिर सुडके, अरविंद बघेले, अरुण पिल्ले, नरेन्द्र तुरकर तथा दिलीप सिंह सुर्यवंशी अध्यक्ष सैनिक संघटना मध्य प्रदेश छत्तीसगढ राजस्थान उपस्थित होते.