समस्या निवारणासाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत
नागपूर :- शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे, नागरीकांना काही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे नागपूरकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, शहरात पाणी जमा होणे, झाड पडणे अशा अनेक तक्रारी मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होत आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींवर अग्निशमन विभागाद्वारे तात्काळ दखल घेत कार्यवाही केल्या जात आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत आहे, त्यानुसार बुधवार १४ सप्टेंबर रोजी हुडकेश्वर नाका एस.बी.आय बॅंकेजवळ चाणक्य नगर समोर झाड पडलयाची माहिती मिळताच मनपा कर्मचाऱ्यांनी रोडवरील झाड कापून रोड रहदारीकरीता रस्ता मोकळा केला. टाटा पारसी शाळेजवळ झाड पडल्याची माहिती मिळताच, मनपा कर्मचाऱ्यांनी रोडवरील झाड कापून परिसर सुरक्षित केला. तर, रेडियन्स हॉस्पीटल सतनामी ले-आऊट आंबेडकर चौक वर्धमान नगर येथे रोड वरती झाड पडल्याची माहिती प्राप्त झाल्याने, मनपा कर्मचा-यांनी पडलेले झाड कापून, रस्ता मोकळा करून दिला.
बेसा घोगली नाल्यामध्ये एक व्यक्ती पडला असून शोधकार्य करण्याकरीता गाडी आणि टीम पाठविण्याबाबत माहिती मिळताच, मनपा कर्मचा-यांतर्फे शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.
दुपारी, सक्करदरा एन.आय.टी गार्डन दत्तात्रय नगर आणि वैद्यनाथ चौक रोडच्या मध्ये झाड पडल्याची माहिती प्राप्त झाल्याने, मनपा कर्मचा-यांनी त्वरीत कार्यवाही करीत मनपा कर्मचा-यांनी पडलेले झाड कापून, रहदारीसाठी रस्ता मोकळा करून दिला. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागपूरकरांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे जवान शहरात सर्वत्र सेवाकार्य बजावत आहेत.