अनेकदा एखादी प्रेयसी एकाचवेळी फारतर दोघांना फिरवते आणि तिसऱ्याच्याच गळ्यात वरमाला टाकून मोकळी होती. विदर्भातील वर्धा जिल्हा तेथील आर्वी विधानसभा मतदार संघ, जी निवडणूक चर्चेचा विषय आहे प्रचंड यासाठी गाजते आहे कारण तिथे एक प्रेयसी तिचे एकाचवेळी तीन तीन हकदार तिघे तिघे प्रियकर होते, तिघेही एकसे बढकर एक त्यामुळे प्रेयसीची पंचाईत, वरमाला घालावी तर कोणाच्या गळ्यात ? उगाचच तुम्हाला फार गोंधळात टाकत नाही, 2019 दरम्यान आर्वी विधानसभा भाजपाच्या दादाराव केचे यांनी काँग्रेच्या हातून हिसकावून घेतली मात्र त्यानंतर लगेच या मतदार संघात भाजपाचे तीन अतिशय प्रभावी व्यक्ती आमदारकीसाठी तेव्हापासूनच तयारीला लागले होते त्यातले एक अर्थातच विद्यमान आमदार दादाराव केचे दुसरे नितीन गडकरी यांचे म्हणाल तर सर्वेसर्वा किंवा खाजगी सचिव सुधीर दिवे आणि तिसरे होते थेट देवेंद्र फडणवीसांचे सचिव पद सोडून कोणत्याही मोहाला बळी न पडता आर्वीत ठाण मांडून बसणारे सुमित वानखेडे, उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात हा साऱ्यांना पडलेला प्रश्न होता कारण तिघेही दावेदार आणि राजकीय दृष्ट्या अतिशय प्रभावी उमेदवार, शेवटी सुधीर दिवे मोठ्या मनाने बाजूला झाले, फडणवीसांनी केचे यांना विधान परिषदेचा शब्द देत त्यांची समजूत काढली आणि आर्वी नामक सुंदर प्रेयसीने उमेदवार सुमित वानखेडेंच्या गळ्यात माळ घातली, अखेरपर्यंत आपापसातली हि तगडी स्पर्धा या तिन्ही प्रियकरांना अस्वस्थ करीत होती…
तसाही आर्वी विधानसभा मतदार संघाचा इतिहास एखाद्या चालू चंचल सेक्सी सुंदर सतत प्रियकर बदलणाऱ्या प्रेयसीसारखा, 2014 मध्ये तेथे अमर शरद काळे काँग्रेसतर्फे आमदार होते, जे अनिल देशमुखांच्या मोठ्या भगिनींचे चिरंजीव आहेत अमर यांचे दिवंगत पिता शरद काळे देखील आमदार होते राज्यमंत्री देखील झाले होते पण ते लवकर देवाघरी गेले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दादाराव केचे यांनी याच अमर काळेंचा तब्बल साडेबारा हजार मतांनी पराभव केला होता, यावेळी तेथे फडणवीसांचे खास सुमित किशोर वानखेडे विरुद्ध अनिल देशमुखांची भाचे सून, वर्ध्याचे खासदार अमर शरद काळे यांच्या पत्नी मयुरा या शरद पवारांच्याच राष्ट्रवादी तर्फे उमेदवार आहेत आणि येथेच माशी शिंकली आहे किंवा काळे देशमुखांच्या कुटुंबात जणू आजच अपशकुन झाला आहे तेथे सुमित वानखेडे यासाठी नक्की निवडून येतील कारण आर्वी तसा याआधी काँग्रेसचा बालेकिल्ला पण शरद पवारांनी तो हायजॅक केला त्यातूनच आर्वीचे मतदार फार दूर, अख्खा वर्धा जिल्हा अनिल देशमुख आणि शरद पवारांवर यासाठी भडकला आहे कारण विनोबा गांधींच्या या जिल्ह्यात विनाकारण शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या सल्ल्यावरून सांगण्यावरून घुसखोरी करीत काँग्रेसला मानणार्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या मतदारांच्या भावनेचा खेळखंडोबा करून ठेवला आहे त्यातूनच सुमित वानखेडे यांना विजय सहज सोपा झाला आहे. अनिल देशमुख यांनी या मतदार संघात एकाचवेळी अनेक गंभीर चुका करून ठेवल्या आहेत एकतर त्यांनी काँग्रेसकडून हा मतदार संघ ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा येथे यापूर्वी फारसा प्रभाव नव्हता त्यांच्या झोळीत टाकला आहे, दुसरी मोठी चूक कि केवळ काही महिने आधी ज्या अमर काळे यांना आर्वी किंवा वर्धा लोकसभा मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिले तेथे दुसर्या कुठल्याही नेत्याला संधी न देता खासदार अमर काळे आणि अनिल देशमुखांनी घरातल्याच मयुरा यांना उमेदवारी बहाल केली, महाआघाडीच्या नेत्यांना कार्यकार्त्यांना आणि स्थानिक मतदारांना अजिबात न रुचलेला हा स्वार्थी मतलबी निर्णय, शिवाय आमदार होण्याआधीच एखाद्या आमदाराला लाज वाटावी पद्धतीची सुमित वानखेडे यांच्या हातून आणल्या गेलेली केल्या गेलेली विकास कामे, हा मितभाषी सुस्वभावी शांत संयमी गावकरी तरुण सुमित मतदारांना एवढा मनापासून भावलाय कि लहानपणापासून एखाद्या मुलीने वर्गातल्या मुलाकडे भावी नवरा म्हणून बघावे तसे सुमित बाबत घडले आहे घडते आहे, आजच जो तो मतदार सुमित वानखेडे यांच्याकाठी उद्याचा आमदार म्हणून बघतो आहे…
सुमित वानखेडे यांचे बोलणे सांगणे शब्द देणे हे बुढीके बाल पद्धतीचे तोंडातल्या तोंडात चव विरघळण्यासारखे नसते किंवा हवेतल्या हवेत विरणारे नसते तर ते जे बोलतात ते करून दाखवितात डिट्टो देवेंद्र फडणवीस त्यामुळे सर्वांगसुंदर आर्वी हा त्यांनी दिलेला शब्द ते नेमका प्रत्यक्षात उतरवतील किंबहुना आमदार होण्याआधीच आमदाराने करावयाची विकास कामे सुमित यांच्या हातून घडतांना आर्वीकरांनी अनुभवली असल्याने ते एकाचवेळी भाजपा फडणवीस आणि आर्वीकर मतदारांच्या गळ्यातले ताईत आणि सर्वांना आवडणारे सर्वांचे लाडके आवडते नेते. महत्वाचे म्हणजे एकाचवेळी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस दोघांनीही अगदी मनापासून केचे यांना त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द, दादाराव निश्चितपणे सहकार्य सुमित वानखेडेंना निवडून आणण्या करतील, सुमित पुढले आमदार असतील…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी