दहावी बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ

नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी करिता खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज फॉर्म नं १७ अतिविलंब शुल्काने ऑनलाईन भरता येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे नागपूर विभागीय मंडळाचे सचिव बी.आर.रोकडे यांनी कळविले आहे.

इयत्ता १० वी व १२ वी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन २० रूपये या प्रमाणे स्विकारण्यात येईल, तसेच नावनोंदणी अर्ज सादर करण्याची तारीख बुधवार दिनांक २० डिसेंबर २०२३ या कालावधीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://from१७.mh-ssc.ac.in बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://from१७.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्‍वत:चा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.

कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलद्वारे कागदपत्रांचा छायाचित्र काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांने संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट, शुल्क पावती, हमीपत्र यासह 2 प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे.

इयत्ता 10 वी नोंदणी शुल्क 1 हजार रूपये, प्रक्रिया शुल्क 100 रूपये, विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क. इयत्ता 12 वी नोंदणी शुल्क 600 रूपये, प्रक्रिया शुल्क 100 रूपये, विलंब शुलक्‍ व अतिविलंब शुल्क. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या, प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, माध्यमि‍क शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.

पात्र विद्यार्थ्यांनी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे यांची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाच्या तर्फे शिवशक्ती नगर येथील नारीशक्ती जागृत

Tue Dec 12 , 2023
– शिवशक्ती नगर नंबर 2 हनुमान मंदिराच्या परिसरातील विकास कामासाठी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाने घेतली धाव: नागपूर :- दक्षिण नागपूर येथील प्रभाग 34 मध्ये शिवशक्ती नगर नंबर 2 येथील हनुमान मंदिर परिसरातील चर्चा कार्यक्रमात विकास कामासाठी आणि समाजसेवा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघातर्फे सत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकार संजय पांडे व आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने आज चर्चामध्ये शिवशक्ती नगर नंबर 2 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!