रब्बी पणन हंगाम 2022-23 साठी ऑनलाईन नोंदणी करीता मुदतवाढ

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळ मर्यादित नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार आधारभुत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2022-23 मध्ये शासन निर्णयानुसार धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी करिता दि. 15 मे 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली असुन ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणेसाठी स्वत: सातबारा व इतर आवश्यक दस्ताएवजासह आपल्या नजिकच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे खरेदी केंद्राशी संपर्क साधुन आपली नोंदणी करुन शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे उप प्रादेशिक व्यवस्थापक अहेरी (उच्च श्रेणी) बि.एस. बरकमकर यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक कामगार दिनानिमित्त वाडीत कामगारांचा भावपूर्ण सत्कार

Wed May 3 , 2023
– कामगार हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा – दिनेश बन्सोड,माजी जि.प.सदस्य वाडी (प्र):- जागतिक कामगार दिनानिमित्त वाडी स्थित अमरावती महामार्गावरील प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रांगणात इंडेन गॅस सिलेंडर सर्विसेसच्या कामगारांचा एका विशेष कार्यक्रमांतर्गत भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोरगडे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com