नागपूर :- केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचवून शेवटच्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला नागपूर महानगरपालिकेतर्फे २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा एकाच छताखाली लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या यात्रास्थळी भेट द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
यापुर्वी विकसित भारत संकल्प यात्रा ५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या अभियानाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आता या यात्रेला २५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरणार असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, स्वच्छ भारत मिशन, आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्जवला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहे.
विकसीत भारत संकल्प यात्रा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा दहाही झोन निहाय विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्यासंख्येत शिबिरांना भेट देत विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक
१७ फेब्रुवारी : नेहरूनगर झोन – सोनझरी नगर शितला माता मंदिर, बिडीपेठ दवाखाना त्रिकोणी मैदान
गांधीबाग झोन – गंगाबाई घाट स्वीपर कॉलनी, गांधीबाग उद्यान
१८ फेब्रुवारी : सतरंजीपुरा झोन – विठ्ठल रुक्मिणी मंदिर तांडापेठ, बिरसामुंडा समाज भवन बारसेनगर
लकडगंज झोन – बावनकुळे ट्रेडर्स जुना कामठी रोड जवळ, लक्ष्मीनगर सेलोकर जनसंपर्क कार्यालयाजवळ
१९ फेब्रुवारी : आशीनगर झोन – कल्पना नगर उद्रयान, दीक्षित नगर उद्यान
मंगळवारी झोन – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा, मार्टीन नगर चर्च
२० फेब्रुवारी : लक्ष्मीनगर झोन – एकात्मता नगर मनपा प्राथमिक शाळा, अहिल्या नगर मैदान
धरमपेठ झोन – दाभा समाज भवन, गांधी पुतळा समाज भवन सुरेंद्रगढ
२१ फेब्रुवारी : हनुमान नगर झोन – शिवाजी कॉलनी शिव मंदिर हुडकेश्वर रोड, गांधी मार्केट गजानन मंदिर सोमवारी क्वॉटर जवळ
धंतोली झोन – कैकाडी सभागृह शनिवारी कॉटन मार्केट, सम्राट अशोक समाज भवन कौशल्या नगर
२२ फेब्रुवारी : नेहरूनगर झोन – अनमोल नगर उद्यान, शितला मंदिर गोपालकृष्ण नगर
गांधीबाग झोन – ई-लायब्ररी शाहु वाचनालय, जुनी पोलिस चौकी चिटणवीसपुरा
२३ फेब्रुवारी : सतरंजीपुरा झोन – हनुमान मंदिर संत कबीर शाळेजवळ बांगलादेश, साईनगर समाजभवन प्रेमनगर
लकडगंज झोन – जयहिंद स्कूल गुलशन नगर, शितला माता मंदिर देशपांडे लेआउट
२४ फेब्रुवारी : आशीनगर झोन – नारी समाज भवन, पवन नगर (राहुल बुद्ध विहार)
मंगळवारी झोन – शिव मंदिर खलाशी लाईन मोहन नगर, गणेश मंदिर समाज भवन
२५ फेब्रुवारी : लक्ष्मीनगर झोन – जयताळा मराठी उच्च प्राथमिक शाळा, प्रध्या नगर मैदान
धरमपेठ झोन – मकरधोकडा मनपा शाळा, समाज भवन टेकडीवाडी