नागपूर : थकीत मालमत्ता कर संकलनासाठी नागपूर महानगपालिकेतर्फे कठोर पावले उचलली जात आहेत. मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत वॉर्ड क्र. ६८ मौजा दाभा व हजारीपहाड येथील भूखांधारकांनी थकीत मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कराचा भरणा न केल्यास संबंधित भूखंडावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती झोनचे सहायक अधीक्षक बहादूरसिंग बरसे यांनी दिली आहे.
मौजा दाभा व हजारीपहाड येथील भूखंडाची सायबरटेक कंपनी मार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून प्रत्यक्ष भूखंडावर जाऊन देयके प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तसेच थकीत मालमत्ता धारकांनी देयके धरमपेठ झोन कार्यालयातून प्राप्त करावे असे आवाहनही धरमपेठ झोनचे सहायक अधीक्षक बहादूरसिंग बरसे यांनी केले आहे.
ही कार्यवाही धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या मार्गदर्शनात सहायक अधीक्षक बहादूरसिंग बरसे, कर निरीक्षक सुशील निमगडे, प्रसाद चोपे, अरुण मेहरुलिया, कर संग्राहक गौतम शंभरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
थकीत मालमत्ता कर असलेल्या सोसायटी व खासरा क्रमांक
मौजा : दाभा, हजारीपहाड
खसरा क्र. सोसायटीचे नावं
७२/७३ – सुयोग नगर गृह निर्माण सहकारी संस्था
१५६/२,१५७,१५८ – वुडलँड को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
१६०/२ – विजयराज को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
२४/१,३ – पंजाबराव कृषी विद्यापीठ कर्मचारी सहकारी संस्था
१४/२ – महात्मा गांधी गृह निर्माण संस्था
१०,११ – मालिक मकबूजा
६२/१ – श्री गणेश को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
२८/१,२८/२ – नागपूर गृह निर्माण संस्था
१५ – संत ताजुद्दीन बाबा को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
१७/२,३४/१,२ – दीपावली को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
१४/१ – ओशो ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
६१ – बाळाभाऊपेठ को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
१७/२,३४ – मालीक मौजा
१७/२,३४ – नीता को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी