संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारे राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ करिता इतिहास अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी भारताचे पहिले गृहमंत्री व उप-प्रधानमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त तर माजी प्रधानमंत्री भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करून इतिहास अभ्यास मंडळ कार्यकारिणी गठीत करण्याचा उद्देश्य स्पष्ट करतांना नविनी शैक्षणिक धोरण २०२० ची माहिती विद्यार्थ्यांना दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व कार्यक्रम अध्यक्ष डॉ. मनिष चक्रवर्ती यांनी नवीन गठीत कार्यकारिणी आणि विद्यार्थ्यांना सरदार पटेल आणि इंदिरा गांधीच्या पद चिन्हावर मार्गक्रमण करण्याचे आव्हान केले. इतिहास अभ्यास मंडळाच्या सल्लागार समिती व सी.डी.सी. सदस्य डॉ.जयंत रामटेके राष्ट्रीय एकता दिनी गठीत कार्यकारिणीने एकतेने व सूत्रबद्ध रीतीने कार्य केल्यास ती यशस्वी होईल असे मत मांडले. विशेष अतिथी डॉ.इंद्रजित बसू यांनी अभ्यासासोबतच खेळातही सहभागी होण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीतील निर्वाचित अध्यक्ष मिताली गेडाम, उपाध्यक्ष सिमरन पाल, सचिव विकास शेंडे, सहसचिव शाजीया शेख, कोषाध्यक्ष समिक्षा बादुले, सदस्य प्रज्वल सौलंकी, अमन सहारे, मुस्कान सायरे, अलफिया शेख, मिसाब-उर रहमान, आयशा हाशमी, अंकिता मानकर, भूमि चंदानिया, साक्षी मस्के, वासनिक यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेवून करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.रेणू तिवारी, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे, डॉ. संजीव शिरपूरकर, विशेष दिवस कार्यक्रम समिती सदस्य डॉ.अजहर अबरार, डॉ.महेश जोगी, डॉ.विकास कामडी, यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेवून करण्यात आली. प्रस्तावना डॉ. सिद्धार्थ मेश्राम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल गुजरकर यांनी केले तर आभार मिताली गेडाम यांनी मानले.