स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद

रोख बक्षिसांसोबत आपला परीसर सुंदर करण्याची सुवर्णसंधी

नोंदणी करा अंतिम तारीख २५ ऑक्टोबर

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद लाभत असल्याने स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबरपर्यंत असल्याची माहिती महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे.

या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटांना भरघोस पारितोषिक तसेच ज्या वॉर्ड परिसरातुन प्रवेशिका आली असुन विजेती असेल त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. जसे प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे,द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे,तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे विजेते गटांना करता येणार आहे. तसेच टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु ( Using Waste to Create Best ) बनविणाऱ्या गटांना सुद्धा २१ हजार रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा होणार असुन सदर स्पर्धेत नागरिकांना गट बनवुन सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटामध्ये कमीत कमी २५ सदस्य असणे आवश्यक आहे. सौंदर्यीकरण करण्यास मनपा मार्फत झाडे व पेंटिंग कलर (मर्यादित) पुरविण्यात येणार असुन इतर काही साहित्याची आवश्यकता असल्यास जसे सुरक्षा साधने इत्यादी मात्र त्या स्पर्धक गटाला स्वतः करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी गुणांकन पद्धत निश्चित करण्यात आली असुन कामाच्या तासांवर तसेच कामात दररोज किती व्यक्ती सहभागी होतात यावर त्रयस्थ निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मुख्य चौक, रस्ता दुभाजक, बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे.      https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeF1jcqqWbAjg1VLX3hvjt0QZIAd93GUt3-usmi1FSSvZv49g/viewform?usp=sharing या गुगल लिंकवर माहीती भरुन स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येईल. सदर लिंक मनपाच्या फेसबुक पेजवर सुद्धा उपलब्ध आहे. स्पर्धेत नागरिकांनी आपल्या टीमसह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात दिवाळी निमित्त कर्मचा­यांना उपहाराचे वितरण कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचा पुढाकार

Fri Oct 21 , 2022
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नियमित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, एकत्रित वेतनिक, दैनिक वेतनिक, अंशदायी शिक्षक, परीक्षा विभागातील जॉब वर्कर, उद्यान विभागातील मजूर वर्ग, सुरक्षा रक्षक, सफाईगार, सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिवाळी निमित्त विद्यापीठ अधिसभागृहात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपहार देण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यापीठात कार्यरत सर्व कर्मचारी व शिक्षक सातत्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!