सावनेर :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून स्थानिक लॉयन्स क्लब आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सैनिक सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला. दरवर्षी 26 जुलै संपूर्ण भारतात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्टेशन च्या नविन सभागृहात पार पडलेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थान वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी भूषविले. सैनिकांच्या संरक्षण सेवेतील फक्त नोकरी नसुन त्याग, साहस, धाडस आणि विरतेचे प्रतिक आहे, यातून नविन पीढीने प्रेरणा घेण्याचे आव्हान त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. अभिषेक मुलमुले, अध्यक्ष लायन्स क्लब यांनी केले. क्लबचे विवीध समाजोपयोगी उपक्रम आणि सैनिकांचे समाजातील महत्व प्रास्ताविकातून विषद केले. याप्रसंगी बाबाराव पटे, पुरुषोत्तम काळे, ज्ञानेश्वर गमे, देवमन सारवे , धर्मेंद्र छेनीया आणि सुधाकर मानकर या माजी सैनिकांचा शाल आणि भेटवस्तू देवून सत्कार-सम्मान करण्यात आला. सत्काराच्या उत्तरात सैनिकांनी कारगिल युद्धातील घटनाक्रम आणि रोमांचित करणारे अनुभव सांगीतले. अशा प्रकारचा सत्कार स्वीकारतांना अतिशय आनंद झाल्याचे सैनिकांनी सांगितले. सैनिक आपले कुटुंब सोडून, उमेदीच्या काळात देशाची सेवा करताना किती कठीण प्रसंगांना सामोरे जातात या अनुभवातून सभागृह भावनिक झाले होते. कारगील युद्धात पाचशे हून अधिक शहीद सैनिकांना भावपूर्ण अद्धांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विलास डोईफोडे, सचिव लायन्स क्लब यांनी केले तर आभार वत्सल बांगरे, चार्टर प्रेसीडेंट यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. अमित बाहेती, डॉ. प्रविण चव्हाण, रुकेश मुसळे, पियुष सिंजूवाडीया, डॉ. परेश झोपे, हितेश ठक्कर, प्रविण सावल, प्रविण टोणपे, डॉ. छत्रपती मानापूरे, अँड. अन्वेषा मुलमुले, मृणालीनी बांगरे, अँड मनोजकुमार खंगारे , मिथीलेश बालाखे आणि सुनिल तलमले यांनी मोलाचे सहकार्य केले.
लायन्स क्लब तर्फे माजी सैनिकांचा सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com