संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी येणारे दिवस हे पोळा,गणेशोत्सव, दुर्गोत्सव व अन्य समारंभाचे असून सर्वांनी एकोपा व जातीय सलोखा राखून उत्सव साजरा करण्याचे आवाहन नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी गादा गावात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून वक्तव्य केले.
याप्रसंगी गादा ग्रा प उपसरपंच मोहन मारबते,हेमराज गोरले, अमोल ठाकरे,कमलाकर खुरपडी,राहुल खुरपडी,अतुल खुरपडी तसेचगादा,आजनी,रणाळा,नेरी,उनगाव,आवंढी,घोरपड,धारगाव,शिरपूर, अशा विविध गावातील पोलिस पाटील व गावकरी मंडळी सह गनमान्य नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे म्हणाले की गणपती,शारदा, नवरात्री,दूरगोत्सव,दसरा, दिवाळी,धम्म चक्र प्रवर्तन दिन ,रमजान ईद तसेच अन्य धर्मियांचे सणासुदीच्या वेळी व देवी देवतांच्या विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये याची सर्वांनी दक्षता खबरदारी घेण्याचे आवाहन करून सर्वधर्म समभाव व एकात्मतेचे महत्व पटवून दिले.बैठकीचे प्रास्ताविक व संचालन पोलीस विभागाचे अखिलेश ठाकूर यांनी केले तर आभार गादा गावच्या पोलीस पाटील वंदना ताई चकोले यांनी मानले.