संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत करण्यासाठी सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद विसरू सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रदेश भाजप अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी येरखेडा गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या बारा दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपात भेट देण्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
येरखेडा गावकऱ्यांच्या वतीने येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या 12 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू असून उपोषण मंडपाला प्रदेश भाजप अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार टेकचंद सावरकर यांनी भेट दिली असता गावकऱ्यांनी सांगितले की, येरखेडा ग्रामपंचायत नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असून पंचायत ची लोकसंख्या 35 हजारा च्या जवळ असून 20 हजार मतदार आहेत ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात लेआउट असून ग्रामपंचायत कडून कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत नाही विकास कामाकडे ग्रामपंचायत सरपंच सतत दुर्लक्ष करीत आहे त्याकरिता येरखेडा ग्रामपंचायत नगरपंचायत करून देण्याची मागणी केली याप्रसंगी मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर म्हणाले ,आपल्या समस्या आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांचे समोर ठेवून येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा लवकरच मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रडके, माजी उपसभापती देवेंद्र गवते ,माजी सरपंच मंगला कारेमोरे ,मनीष कारेमोरे ,ग्रामपंचायत सदस्य सतीश दहाट ,आचल तिरपुडे ,कुलदीप पाटील, नरेश मोहबे ,जयश्री धीवले ,अनिल भोयर, एडवोकेट आशिष वंजारी, गजानन तिरपुडे, राजकिरण बर्वे, ईश्वरसिंग चौधरी, राजेंद्र चौरे ,कुबेर महाले ,शुभम चौधरी, जॉनी भस्मे, पुरोषात्तम पोटभरे, मुकेश कनोजिया ,विकास वाटकर, जया भस्मे, सुषमा राकडे, सरिता भोयर ,शितल चौधरी ,सुनिता आगाशे, वनिता नाटकर, रेखा मराठे, मुक्ता कारेमोरे संगीता कारेर्मोरे ,कविता बावनकर , सुषमा तलमले ,प्रीती देशमुख, शीला देशमुख, सविता कुलरकर, रेणुका गुजेवार ,मोनिका शेंडे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.