संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-शितपेटी दान करणाऱ्या बौद्ध दाम्पत्यांचा सत्कार
कामठी ता प्र 4 :- जन्म आणि मृत्यू हे एकाच सिक्क्याचे दोन बाजू आहेत.मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला धडपड करीत स्वतःच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करीत ‘कुटुंबाचा कर्ता’या भूमिकेतून धडपड करावी लागते मात्र यासह सामाजिक बांधिलकी जोपासत या समाजाला आपल्याला काही देणे आहे ही आपली नैतिक जवाबदारी आहे तेव्हा समाजातील सुजान नागरिकांनी समाजाप्रती आपल्या जवाबदारीचा संवेदनशीलतेने वाटा उचलला तर पर्यायाने मानव सेवेचा धर्म पाळता येऊ शकतो असल्याचे मौलिक मत आंबेडकरी चळवळीतील समाजसेविका विद्याताई भिमटे यांनी यशोधरा बुद्ध विहारात आयोजित सत्कार समारंभ तसेच निर्वाण रथ आढावा बैठकीत व्यक्त केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान स्थित यशोधरा बुद्ध विहारात काल 3 जुलै ला लोकवर्णनितुन कार्यरत असलेले निर्वाण रथाचा जमा खर्च संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली तसेच समाजाला शितपेटी दान देणाऱ्या बौद्ध दाम्पत्य समाजसेविका विद्याताई भिमटे व किशोर भिमटे यांचा बौद्ध उपासक, उपसिकाच्या मुख्य उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक सेवानिवृत्त कर्मचारी उमाकांत चिमनकर यांच्या शुभ हस्ते शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्याताई भिमटे यांनी आपले मौलिक असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सहारे गुरुजी, मनोहर गणवीर, राजेश ढोके, ज्ञानेश्वर रामटेके, राजेश फकिर्डे, वीरेंद्र मेश्राम, दुर्गाताई आस्वले आदी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
मागील पाच वर्षांपूर्वी 6 डिसेंबर 2017 ला परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या उद्देशाने समाजातील लोकपुढाऱ्यांच्या पुढाकारातून व लोकांनी दाखविलेल्या सहभागातुन स्वर्गवासी अशोक मंडपे यांच्या नेतृत्वात लोकवर्गणीतून उभारलेले ‘निर्वाण रथ ‘समाजाला अर्पित करण्यात आले.ज्याचा शुभारंभ भन्ते नागदीपंकर यांच्या हस्ते करण्यात आला होता.हे निर्वाण रथ समाजातील बुद्धवासी झालेल्या पार्थिवाना मोक्षधाम घाटावर पोहोचविण्याचे मौलिक कार्य करीत आहे.या निर्वाण रथाचा सांभाळ करणारे मनोहर गणवीर , राजेश ढोके यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निर्वाणरथाचा जमा खर्च हिशोब सादर केला.तसेच निर्वाण रथ ठेवण्यासाठी शेड निर्माण करण्याचा विषय मांडण्यात आला.या सभेचे प्रास्ताविक राजेश ढोके, मनोहर गणवीर यांनी केले तर आभार वीरेंद्र मेश्राम यांनी मानले.