संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23 – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्वरभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मूर्ती तेवत राहाव्यात .या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञान, क्रांतिकारांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रत्येकाच्या घरावर ,कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकेल यासाठी ‘हर घर तिरंगा’हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तेव्हा या स्वराज्य महोत्सवात कामठी तालुक्यातील प्रत्येक नागरीकानी सहभाग नोंदवित उपरोक्त नमूद कालावधीत आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उभारावा असे आवाहन कामठी पंचायत समितीचे बीडीओ अंशुजा गराटे यांनी केले आहे.
कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अतिशय गरीब कुटुंबातील नागरिक या मोहिमेपासून वंचित न राहावे यासाठी 3800 तिरंगी झेंडे हे पंचायत समिती अंतर्गत ग्रा प ला मोफत वितरण होणार आहे.तेव्हा ग्रामस्थांनी या हर घर तिरंगा मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन बीडीओ अंशुजा गराटे यांनी केले आहे.