संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 नोव्हेंबर ला कामठी मौदा विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यानुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे त्या अनुशंगाने कामठी मौदा विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी तसेच पक्षाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असे असले तरी आजच्या तिसऱ्या दिवशी पर्यंत नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची संख्या ही निरंक आहे.तर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी मागील तीन दिवसात आजपावेतो 47 व्यक्तींनी 87 अर्जांची उचल केली आहे.