श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना आणि भूमिपूजन रविवारी

– गोमातेच्या संरक्षणासाठी श्री. सिद्धीविनायक फाउंडेशनचा पुढाकार

नागपूर :- गोमातेची होणारी तस्करी आणि वाहनांमध्ये कोंबून केली जाणारी वाहतूक या सर्व बाबींपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनने महत्वाचा पुढाकार घेतला आहे. श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने झिल्पी मोहगाव येथे श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना करण्यात येत आहे. रविवारी २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मोहगाव झिल्पी येथे माजी खासदार अजय संचेती यांच्या हस्ते गोरक्षण धामचे भूमिपूजन होणार आहे.

आज गोमातेची होणारी तस्करी, वाहनांमध्ये कोंबून विविध ठिकाणी होणारी वाहतूक ही माणूस म्हणून प्रत्येकासाठी आव्हानाची बाब आहे. हिंदू धर्म संस्कृतीत गायीला आईचा दर्जा आहे. आपल्या आईच्या संरक्षणात आपण समर्थनीय ठरणे ही लाजीरवाणी बाब आहे. नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सात-आठ इंडिका वाहनात पाच ते सहा गायींचे वासरू पकडण्यात आले. अशा अनेक घटना आजुबाजूला घडत असतात. स्वतः ला हिंदू म्हणवून घेणारे आपण गोमातेला आपल्या आईला वाचविण्यात असमर्थ ठरणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. सरकारने, पोलीस यंत्रणेने काम करावे आणि आपण फक्त बाता मारायच्या ही मानसिकता सोडण्याची गरज आहे. हिंदू म्हणून, माणूस म्हणून आपल्या गोमतेला वाचवणे आपले आद्य कर्तव्य आहे. याच भावनेतून श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने झिल्पी मोहगाव येथे श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना केली जात आहे. या कार्यात सर्व गोरक्षक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी महापौर तथा श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धामचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले आहे.

रविवारला होणाऱ्या गोरक्षण धाम भूमिपूजन कार्यक्रमात सर्व नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप जोशी यांच्यासह श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धाम संचालन समितीचे उपाध्यक्ष गुरदीपसिंग कपूर, सचिव योगेश पालीवाल, कोषाध्यक्ष अनिरुद्ध भगत, सदस्य आशिष विजयवर्गीय, सदस्य योगेश जोशी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अभिनंदन स्कूल में छात्रों का गुण गौरव

Sat Jun 1 , 2024
नागपुर :- वंदना शिक्षण संस्था ओमनगर नागपुर द्वारा संचालित अभिनंदन हाईस्कूल, ज्यूनियर कॉलेज बापूनगर में एसएससी बोर्ड परीक्षा में प्रवीणता प्राप्त गुणवंत छात्रों सत्कार संस्था सचिव रमेश वंजारी, प्राचार्य डॉ. नरेंद्र भुसारी के हस्ते किया गया। एसएससी परीक्षा में हाईस्कूल का परिणाम 92:20 प्रतिशत हैं। स्कूल से प्रथम क्रमांक पलक सुरेंद्र चव्हाण 87:20, द्वितीय क्रमांक जानव्ही सोपनराव घूमे, उत्कर्ष रामनाथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com