जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

नागपूर : सामान्य नागरीकांना त्यांचे प्रश्न जिल्हास्तरावर सोडविण्याकरीता सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याकरीता ग्रामिण भागातील नागरीकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून त्याचा निपटारा करण्याकरीता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचा नागरीकांनी अधिकाधिक फायदा घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आवाहन केले आहे.

राज्यातील सर्व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्विकारून त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचीत कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याकरीता विभागीयस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयाची स्थापना करण्यात आली आहे.

त्याच धर्तीवर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून कक्षाकरीता विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत खरेदीदार-विक्रेता संमेलन

Wed Dec 28 , 2022
नागपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील विविध योजनांची माहिती होण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन केंद्र यांच्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होणेसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांचे समन्वयाने दि. 4 ते 8 जानेवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शेतक-यांना ग्राहकांसाठी थेट विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. याचे औचित्य साधून PMFME […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com