कृषी विभागाकडून नि:शुल्क क्रमांक जाहीर
नागपूर : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी खते, किटकनाशके व बी बियाणे खरेदी करताना, त्याच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत येणा-या अडचणी किंवा तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, येथे शेतक-यांना नि:शुल्क क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तक्रारी देता येणार आहेत, असे कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शेतक-यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या 18002334000 आणि 9373821174 या नि:शुल्क क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या jdanagpur@gmail.com या इमेलवर शेतकऱ्यांच्या निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी आणि लिंकींगबाबत येणाऱ्या अडचणींची तक्रार शेतकऱ्याने त्याचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा संक्षिप्त तपशीलासह नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी केले आहे.