EWS आरक्षणाचे स्वागत! – राकेश त्रिपाठी.
वाडी :- ब्राह्मण समाजाची ढासळलेली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने नुकतीच ब्राह्मण सेना फाउंडेशन वाडी-वडधामना शाखेची स्थापना करण्यात आली आहे.
या संदर्भात वाडीतील पत्रकार परिषदेत ब्राह्मण सेना फाउंडेशनचे वाडी-वडधामनाचे नवनियुक्त अध्यक्ष राकेश त्रिपाठी यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाला समाजात पुन्हा सन्मान मिळावा, त्यांच्या समाजातील विद्यार्थ्यांना ,युवकांना नोकरी-व्यवसाय संधी मिळावी,महिला, समाजातील तरुण यांना क्रियाशील बनवावे,धार्मिक कार्यक्रम उत्सव जोरात साजरा करण्याच्या उद्देशाने ब्राह्मण सेना फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी-वडधामना परिसरातील ब्राह्मणांना संघटित करण्याचे काम केले जाणार आहे. राकेश त्रिपाठी व सेना उपाध्यक्ष धर्मेंद्र मिश्रा, पदाधिकारी विजय शुक्ला, मोहन मिश्रा या वेळी उपस्थित होते. त्यांनी सभासदांच्या प्रगतीबाबत व संस्थेच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम आयोजनाबाबत मनोगत व्यक्त केले.नुकतेच सुप्रीम कोर्टाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण निर्णय स्वागत योग्य असल्याचे सांगून ,भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या कलमांच्या आधारे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांसह आता खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या दुर्बल घटकांनाही आरक्षण मिळाले आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात प्रगतीची संधी मिळेल. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय राज्यघटना, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.तसेच समाज बांधव राजू मिश्रा, सुनील मिश्रा, महेंद्र दुबे, संदीप पांडे, अरुण त्रिपाठी, मनीष तिवारी, सुरेंद्र मिश्रा, पवन पांडे. इ. 11 तारखेपासून सुरू होणाऱ्या वसंत विहारच्या 7 दिवसीय श्री राम कथा महोत्सवात सर्व नागरिक व लहान मुलांनी उपस्थित राहण्याचे ही आवाहन करण्यात आले आहे.