नागपूर :- दिक्षाभूमी परिसरामध्ये मातोश्री रमाई आईचा पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी गुरुवार ला पत्रपरिषदेच्या माध्यमातून प्रबुद्ध उपासिका महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी सदैव मातोश्री रमाई आंबेडकरांची साथ होती. अनेक कष्ट रमाई आईने सहन केले. रमाई आई देशातील महिलांसाठी एक मोठे आदर्श आहे. पवित्र दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आहे. अगदी त्यांच्याच बाजूला मातोश्री रमाईचा पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी प्रबुद्ध उपासिका महिला मंडळांनी केली आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विलास गजघाटे यांना प्रबुद्ध उपासिका महिला मंडळाच्या द्वारा निवेदन देण्यात आले. आठवड्याभरात मागणीवर निर्णय घ्यावा. अशीही विनंती यावेळी करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य दिव्य अशी मूर्ती थायलंड येथून आणण्यात आली असून दीक्षाभूमी येथे मूर्तीची स्थापना करण्यात आली. आमचा याला विरोध नसून मातोश्री रमाईचा पुतळा सुद्धा स्मारक समितीच्या दीक्षाभूमी परिसरात उभारावा. अशी मागणी परिषदेत करण्यात आली. यावेळी पत्रपरिषद मध्ये मीना मून, कमल भगत, चंद्रकला दुपारे, यशोधरा सावनकर, सरिता मंगेशकर, मिना खैरकर, शीला तेलंग, अलका तागडे, संध्या बोरकर, वंदना पाटील, रेखा टेंबरे, अलका पाटील, आशा भगत, ज्योती बेले, मनिषा भगत, प्रमिला टेंबेकर, सुमन कानेकर, आणि यावेळी खुप मोठ्या संख्येने उपासिका उपस्थितीत होत्या.
दीक्षाभूमीवर मातोश्री रमाई आईचा पुतळा उभारा – प्रबुद्ध उपासिका महिला मंडळाची मागणी.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com