संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-बिना ( संगम ) येथे भोई समाजाची जनजागृती सभा संपन्न
कामठी :- माजी खा. स्व.जतिराम बर्वे यांनी निर्माण केलेली झिरो माईलची इमारत शासनाद्वारे उद्धस्त करण्यात आली आहे. ती इमारत त्याच जागेवर पुनर्निर्माण व्हावी व नागपूर येथे माजी खास जतिराम बर्वे यांचे स्मारकाकरिता तेलंगखेडी येथिल 2 एकर जागा शासनाने दयावी या करिता भा.मो.वि. मं. व अन्य संघटनाच्या संयुक्त प्रयत्नाने जन जागृती कार्यक्रम आयोजित केल्या जात आहेत. त्याच अभियाना अंतर्गत कामठी तालुक्यातील बिना येथे दि. ७ मे ला भोई समाजाचे जेष्ठ नेते गणेश मेश्राम यांचे अध्यक्षतेत सभा संपन्न झाली.
या सभेत बिना या गावी स्व. खास जतिराम बर्वे यांचा पुतळा उभारावा असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला.यावेळी मा.मा.वि.मं. चे अध्यक्ष ॲड. दादासाहेब बलथरे, महासचिव दिलिप मेश्राम, उपाध्यक्ष मनोहर भोयर, कार्याध्यक्ष अशोक भोयर, मुकुंदा गोंडाले, सल्लागार नामदेव कन्नाके,कोमल देवगडे होते. तसेच अर्जुन मेश्राम, हुकुमचंद मेश्राम, अंकुश मेश्राम, सुलोचना बोंदे, गंगाराम केळवदे, सुरेश केळवदे आदि भोई ढिवर समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिवाळु केळवदे, कैलास गोंडाळे, अमित मेश्राम, अर्जुन मेश्राम, हुकुमचंद मेश्राम, अंकुश मेश्राम, सरस्वता बोटे, गंगाराम केळवदे, सुरेश केळवदे, केळवदे, मेश्राम, आदिनी परिश्रम घेतले.
शेवटी अँड. दादासाहेब वलधरे यांनी प्रत्येक गावात स्व. खास, जतिराम मने यांचे पुतळे उभारावे असे उपस्थितांना आवहान केले. समेचे संचालन अमित मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश हरी केळवदे यांनी मानले.