यवतमाळ :- महावीर इंटरनॅशनल सेवा ट्रस्ट नागपूर व महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रायसोनी फाउंडेशन यांच्या सहकार्याने चळवळीतील नवीन अध्याय मोफत कृत्रिम अवयवांची मूल्यांकन आणि पूर्व नोंदणी शिबिर स्थानीय टिंबर भवन यवतमाळ येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.
याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश चवरे ठाणेदार शहर पोलीस स्टेशन यवतमाळ व पुष्पा पालडीवाल सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, प्रा.डॉ. मनीष वाढवे , महावीर इंटरनेशनल यवतमाल संस्था चे अध्यक्ष प्रवीण निमोदिया , सचिव शोभा दोडेवार या होत्या. सर्वप्रथम भारत मातेच्या फोटोला प्रमुख अतिथींनी माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा मान , सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आपले विचार व्यक्त करताना यवतमाळ शहर ठाणेदार सतीश चवरे यांनी महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या कार्याची कौतुक केले. प्रस्तावना शोभा दोडेवार यांनी तर मंच संचालन शेखर बंड यांनी केले.
या शिबिरामध्ये पेशंटचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून जवळपास 110 पेशंट तपासण्यात आले ज्यात जयपुर फूट , हात , बैसाखी , खुर्ची या प्रकारे ज्यांना ज्याची आवश्यकता असेल ते देण्यात येईल यासाठी पात्र व्यक्तीस नोंदणी करून हात व पायाचे माप घेण्यात आले नागपूर येथे जयपुर फूट व हात दिनांक 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर ला वितरित करण्यात येईल . याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा / कर्मचाऱ्यांचा महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्र द्वारा मान , सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेश भूत, श्याम भन्साली, हर्षल एंबरवार, शरद नीमोदिया, रविकुमार निमोदीया , मनोज अग्रवाल , उमेश पोद्दार, ऍड विजय चानेकर, डॉक्टर आनंद भंडारी , महेंद्र बोरा, प्रदीपसिंग नन्नावरे, विनोद महाजन, दिलीप बाविस्कर , उज्वलाताई भाविक, संगीता पिपराणी , डॉ. ललिता घोडे,शुभम् भूटानी, आलोक मडावी, विनोद फुलसंगे ,अनिकेत मानकर, पीयूष पाल, यांनी प्रयत्न केले.