भंडारा :- आत्मा व कृषी विभागाच्या संयुक्त विदयमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन आज तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते.ताज्या व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
काल सकाळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्वानी रानभाज्यांचा वापर दैनंदिन आहारात करण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच आत्मातर्फे प्रकाशित तृणधान्य पाककृतींची विस्तृत माहिती देणारी पुस्तिका जिल्हयाच्या वेबसाईटवर टाकण्याची सूचना त्यांनी यावेळी प्रकल्प संचालक उर्मिला चिखले यांना केली.यावेळी व्यासपिठावर सभापती स्वाती वाघाये, रत्नमाला चेटुले,पंचायत समितीचे सदस्य किशोर ठवकर,जिल्हा अधिक्षक संगीता माने,प्रकल्प संचालक उर्मिल चिखले, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे, यांच्यासह आत्माचे स्मार्टचे नोडल अधिकारी शांतीलाल गायधने, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अजय राऊत ,सतीश वैरागडे,उपस्थित होते.
या महोत्सवात रानभाजी व फळांची वैशिष्ट्ये गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग संवर्धन पद्धती भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती दाखवण्यात आली. तसेच उमेद महीला बचतगटांच्या पाककृती देखील होत्या.
या महोत्सवात, करटोली, घोळ, आंबुशी कुर्डू, केना, सुरण, दिंडा, कुडा, टाकळा, पाथ्री, भुईआवळी, कपाळफोडी, तरोटा, आगडा, उंबर, चिगुर, सराटे, मयाळू,सात्ते,पानफुटी अशा रानभाजा उपलब्ध होत्या. या महोत्सवात आहारतज्ञ मंगला डहाके तसेच उमेदच्या सविता खेडीकर यांनी मार्गदर्शन केले.
या महोत्सवामध्ये रानभाजी व पौष्टिक तृणधान्यांपासून बनविलेल्या पाककृतीच्या स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रथम क्रमांक ज्वारीची भाकरी,गोड घुगरी,केळयाचे वडे ही पाककृती करणा-या पुष्पा नागोसे यांना प्रथम तर मंगला डहाके यांच्या भगर खस्ता,उपमा,शंकरपाळे, तर नगीना बनसोड यांच्या ज्वारीच्या चकली व भाकरीला तृतीय क्रमांक मिळाला.आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते यां विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.