नागपूर :- विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्साहाने पुढे येत मतदान केले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे रामटेक विधानसभा मतदारसंघात झाले. एकूण ७१.८० टक्के मतदानामध्ये पुरुषांबरोबर महिलांनीही हिरिरीने यात सहभाग घेतला. पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण ७३.७९ टक्के तर महिलांचे प्रमाण हे ६९.८१ टक्के होते. एकूण पुरुष मतदारांची संख्या ही १ लाख ४३ हजार ५४० तर महिला मतदारांची संख्या ही १ लाख ४३ हजार ३८९ एवढी होती. यात पुरुषांमध्ये १ लाख ५ हजार ९१५ मतदारांनी तर १ लाख ९९ महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर इतर २ दोन मतदारांपैकी मतदानाचा कुणीही हक्क बजावला नाही. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण २ लाख ८६ हजार ९३१ मतदारांपैकी २ लाख ६ हजार १४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
रामटेक पाठोपाठ उमरेड विधानसभा मतदारसंघात एकूण ७१.१२ टक्के मतदान झाले. पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण 73.33 टक्के तर महिलांचे प्रमाण हे 68.84 टक्के होते. एकूण पुरुष मतदारांची संख्या ही १ लाख 52 हजार ६९५ तर महिला मतदारांची संख्या ही १ लाख ४८ हजार २६१ एवढी होती. यात पुरुषांमध्ये १ लाख 11 हजार ९६८ मतदारांनी तर १ लाख २ हजार ६० महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर इतर १ मतदारांपैकी मतदानाचा कुणीही हक्क बजावला नाही. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण ३ लाख ९५७ मतदारांपैकी २ लाख १४ हजार २८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
काटोल विधानसभा मतदारसंघात एकूण ६९.९४ टक्के एवढे मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ७१.७१ टक्के तर महिलांचे प्रमाण ६८.१३ टक्के एवढे झाले. एकूण १ लाख ४२ हजार ६२३ पुरुष मतदारांपैकी १ लाख २ हजार २७८ एवढ्या पुरुषांनी मतदान केले. एकूण १ लाख ३८ हजार ७३८ महिला मतदारांपैकी ९४ हजार ५२३ मतदारांनी मतदान केले. तर इतर ६ मतदारांपैकी मतदानाचा कुणीही हक्क बजावला नाही. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण २ लाख ८१ हजार ३६७ मतदारांपैकी १ लाख ९६ हजार ८०१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
सावनेर विधानसभा मतदारसंघात एकूण ६८.८३ टक्के एवढे मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ७०.८५ टक्के तर महिलांचे प्रमाण ६६.७९ टक्के एवढे झाले. एकूण १ लाख ६१हजार ७०१ पुरुष मतदारांपैकी १ लाख १४ हजार ५५९ एवढ्या पुरुषांनी मतदान केले. एकूण १ लाख ६० हजार ११४ महिला मतदारांपैकी १ लाख ६ हजार ९३६ मतदारांनी मतदान केले. तर इतर २ मतदारांपैकी मतदानाचा कुणीही हक्क बजावला नाही. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण ३ लाख २१ हजार ८१७ मतदारांपैकी २ लाख २१ हजार ४९५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
कामठी विधानसभा मतदारसंघात एकूण ६४.०५ टक्के एवढे मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ६५.४४ टक्के तर महिलांचे प्रमाण ६२.६६ टक्के एवढे झाले. एकूण २ लाख ५१हजार ३६९ पुरुष मतदारांपैकी १ लाख ६४ हजार ४८८ एवढ्या पुरुषांनी मतदान केले. एकूण २ लाख ५० हजार ३८३ महिला मतदारांपैकी १ लाख ५६ हजार ८९५ मतदारांनी मतदान केले. तर इतर १८ मतदारांपैकी २ मतदारांनी मतदान केले. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण ५ लाख १ हजार ७७० मतदारांपैकी ३ लाख २१ हजार ३८५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
हिंगणा विधानसभा मतदारसंघात एकूण ५९.८९ टक्के एवढे मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५९.९८ टक्के तर महिलांचे प्रमाण ५९.८१ टक्के एवढे झाले. एकूण २ लाख ३२ हजार १४८ पुरुष मतदारांपैकी १ लाख ३९ हजार २३५ एवढ्या पुरुषांनी मतदान केले. एकूण २ लाख १७ हजार ९६४ महिला मतदारांपैकी १ लाख ३० हजार 3६० मतदारांनी मतदान केले. तर इतर २९ मतदारांपैकी ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण ४ लाख ५० हजार १४१ मतदारांपैकी २ लाख ६९ हजार ५९९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण ५९.४२ टक्के एवढे मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ६०.३२ टक्के तर महिलांचे प्रमाण ५८.५१ टक्के एवढे झाले. एकूण २ लाख १० हजार ५६३ पुरुष मतदारांपैकी १ लाख २७ हजार १७ एवढ्या पुरुषांनी मतदान केले. एकूण २ लाख ८ हजार ३८६ महिला मतदारांपैकी १ लाख २१ हजार ९२९ मतदारांनी मतदान केले. तर इतर ३२ मतदारांपैकी ६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण ४ लाख १८ हजार ९८१ मतदारांपैकी २ लाख ४८ हजार ९५२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ५८.०५ टक्के मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५९.०४ टक्के तर महिलांचे ५७.०९ टक्के मतदान झाले. एकूण २ लाख १२ हजार ९८९ एवढ्या पुरुष मतदारांपैकी १ लाख २५ हजार ७५५ एवढ्या पुरुष मतदारांनी मतदान केले. एकूण २ लाख १५ हजार ७५२ महिला मतदारांपैकी १ लाख २३ हजार १८१ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर इतर १०४ मतदारांपैकी १२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष व स्त्री मतदार मिळून एकूण ४ लाख २८ हजार ८४५ मतदारांपैकी २ लाख ४८ हजार ९४८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात ५७.१७ टक्के मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५९.५८ टक्के तर महिलांचे ५४.८४ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख ६८ हजार १०७ एवढे पुरुष मतदारांपैकी १ लाख १६१ एवढ्या पुरुष मतदारांनी मतदान केले. एकूण १ लाख ७३ हजार २२ महिला मतदारांपैकी ९४ हजार ८८८ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर इतर ४० पैकी ११ मतदारांनी मतदान केले. स्त्री, पुरुष व इतर मिळून एकूण ३ लाख ४१ हजार१६९ मतदारांपैकी १ लाख ९५ हजार ६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ५६.९९ टक्के मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५७.८६ टक्के तर महिलांचे ५६.१४ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख ९३ हजार ७८२ एवढ्या पुरुष मतदारांपैकी १ लाख १२ हजार १३५ एवढ्या पुरुष मतदारांनी मतदान केले. एकूण २ लाख ६३५ महिला मतदारांपैकी १ लाख १२ हजार ६५६ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर इतर ८पैकी २ मतदारांनी मतदान केले. स्त्री, पुरुष व इतर मिळून एकूण ३ लाख ९४ हजार ४२५ पैकी २ लाख २४ हजार ७९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५५.७८ टक्के मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५६.२६ टक्के तर महिलांचे ५५.३१ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख ९२ हजार ७५ एवढ्या पुरुष मतदारांपैकी १ लाख ८ हजार ६६ एवढ्या पुरुष मतदारांनी मतदान केले. एकूण १ लाख ९६ हजार २४७ महिला मतदारांपैकी १ लाख ८ हजार ५४९ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर इतर ३१ पैकी १० मतदारांनी मतदान केले. स्त्री व पुरुष व इतर मिळून ३ लाख ८८ हजार ३५३ पैकी २ लाख १६ हजार ६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५४.५९ टक्के मतदान झाले. यात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५४.९२ टक्के तर महिलांचे ५४.२९ टक्के मतदान झाले. एकूण २ लाख २ हजार २९८ एवढ्या पुरुष मतदारांपैकी १ लाख ११ हजार ९९ एवढ्या पुरुष मतदारांनी मतदान केले. एकूण २ लाख ८ हजार ९१४ महिला मतदारांपैकी १ लाख १३ हजार ४१५ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर इतर २९ पैकी ३ मतदारांनी मतदान केले. स्त्री व पुरुष व इतर मिळून एकूण ४ लाख ११ हजार २४१ पैकी २ लाख २४ हजार ५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.