मनपा प्रवर्तन विभागामार्फत गोपाल नगरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई

नागपूर :- नागपूर शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणा विरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरातील कारवाईला गती देण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. २) रोजी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिका प्रवर्तन विभागामार्फत गोपाल नगर, प्रभाग ३७ येथील नाल्याच्या काठावर असलेले अतिक्रमण काढण्यात आले. लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पक्का बांधकाम काढण्यात आला.

लक्ष्मी नगर झोन क्र. १ अंतर्गत प्रभाग क्र. ३७ गोपाल नगर जुमळे शिवण कला येथे नाल्यालगत अनधिकृत पणे बांधकाम केलेले असून नाल्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण केलेला होता. ज्या मध्ये शांताबाई गायकवाड,सिताराम तांबे, गिरिजबई करस्कर, भाऊराव चव्हाण, मंदा नगराळे, रमेश पटेल, राजू भोंगडे, ईशिका रयपुरे, धनविजय, छाया मेस्कर, रंगारी, सुनिता लांजेवार व डोंगरवार असे एकूण १३ लोकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २६० अन्वये दि. २९/०१/२०१६ रोजी झोन द्वारे नोटीस तामिळ करण्यात आले होते. तसेच WRIT PETITION NO. 7424/2023 व SUO MOTU PUBLIC INTEREST LITIGATION NO. 1 OF 2020, दिनांक. 19 JANUARY 2022 च्या आदेशा नुसार आज कारवाई करण्यात आली. ज्या मध्ये रमेश पटेल यांचे १०० चौ. मी., गिरिजबई करस्कर यांचे १८० चौ. मी, धनविजय, सिताराम तांबे यांचे २२५ चौ. मी. डोंगरवार यांचे २५० चौ. मी, राजू भोंगडे यांचे १५० चौ. मी, लांजेवार यांचे ४०० चौ. मी, रायपुरे यांचे ४०० चौ. मी, रंगारी यांचे १४४ चौ. मी, मंदा नगराळे,भिमराव चव्हाण व शांताबाई गायकवाड यांचे १८० चौ. मी चे बांधकाम पूर्णपणे तोडण्यात आले. या कारवाई दरम्यान अतिक्रमण कारी यांच्या द्वारे प्रचंड विरोध करण्यात आले. परंतु पोलीस विभागा द्वारे पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आल्यामुळे कारवाई पूर्ण करण्यात आली.

• धंतोली झोन क्र ०४ अंतर्गत बकार ईस्माईल शेख व इतर घर .35 बी. कुंभलकर कॉलेजचा मागे ,गणेशपेठ, प्र . क्र 17 नागपुर इथे अनधिकृत बांधकामाची कारवाई करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53(1) अंतर्गत दिनांक 22/2/2019 रोजी झोन द्वारा नोटीस तामील करण्यात आले होते. तर आज अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये यांच्या अनधिकृत बांधकाम हटविण्यात आला आणि परिसर मोकळे करण्यात आले .

• धरमपेठ झोन क्र.02 अंतर्गत झोन कार्यालय ते सिताबर्डी मेन रोड पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले होकर्स यांचे ठेले व दुकान हटविण्यात आले . व परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आले

• ही कारवाई हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण, मिलिंद मेश्राम सहा. आयुक्त लक्ष्मी नगर झोन, संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक व अभिजीत नेताम उप. अभियंता यांचे मार्गदर्शनात विनोद कोकर्दे, पुरुषोत्तम पांडे, महेंद्र सुरडकर क. अभियंता व अतिक्रमण पथका द्वारे करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ७६ प्रकरणांची नोंद

Wed Jan 3 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई  नागपूर :-नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.०२) रोजी उपद्रव शोध पथकाने ७६ प्रकरणांची नोंद करून ३९,४०० रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!