नागपूर :- आज पासून अडीच हजार वर्षांपूर्वी मौर्य घराण्यातील सम्राट अशोक यांनी जे अर्थशास्त्र राबवले ते भारताला श्रीमंत करणारे होते. म्हणून अशोकाच्या काळात भारत (जंबुदीप) समृद्ध व वैभवशाली देश असून भारतात सोन्याचा धूर निघत असल्याचे बोलल्या जाते. असे मत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील पालीचे अभ्यासक डॉ सी पी थोरात यांनी व्यक्त केले.
डॉ सी पी थोरात यांनी वयाच्या 83 व्या वर्षी सम्राट अशोक यांचे अर्थशास्त्र हे बुद्धिझम मधील आदर्शशास्त्र या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागातून पीएच डी केली आहे. ते आर टी एम नागपूर विद्यापीठातील पाली प्राकृत व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील व्याख्यानात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ तुळसा डोंगरे यांनी, सूत्रसंचालन सचिन देव यांनी तर समापन आशा मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.