पात्र उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, फसवणूकीला बळी पडू नये – एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे

– अंगणवाडी सेविका आणि मदतनिस पदाकरिता इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

नवी मुंबई :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाच्या अधिनस्त 104 नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) सरळसेवा कोटयातील पदभरतीसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, फसवणूकीला बळी पडू नये.असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबईचे आयुक्त कैलास पगारे यांनी केले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाच्या गट क संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) सरळसेवा कोटयातील एकूण 102 रिक्त पदभरती प्रक्रीया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आवश्यक त्या उपायोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, रायगड भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शासन धोरणानुसार एकूण 128 रिक्त पदांच्या 80% प्रमाणे 102 पदे भरण्या करीता पात्र उमेदवारांकडून दि. 14-10-2024 में दि.03-11-2024 ऑनलाईन पध्दतीने टी.सी.एस कंपनी मार्फत अर्ज मागविण्यात आले होते. या मध्ये 88 हजार 768 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, दि. 8 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ही परीक्षा 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती आयुक्त पगारे यांनी यावेळी दिली.

ही सरळसेवा भरती प्रक्रिया सुरक्षीत आणि पारदर्शी असून ही कॉम्पुटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा टी. सी.एस-आय. ओ.एन. कंपनी मार्फत विविध परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजीत करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व उमेदवारांसाठी आवश्यकत्या सूचना आयुक्तालयाच्या https://www.icds.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मुख्यसेविका पदासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी दि.8.2.2025 पासून htps://www.icds.gov.in ऑनलाईन हॉलटिकिट उपलब्ध करून देण्यासाठी रजिस्टर मोबाईलवर सूचना देण्यात येतील.

मुख्यसेविका सरळसेवा पदभरती परीक्षा दि. 14 फेब्रुवारी 2025 ते 02 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येईल. परीक्षार्थी यांचे स्थानिक जिल्हयात व लगतच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर टी.सी.एस. मार्फत परीक्षा केंद्र समवेक्षक व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात येते तसेच या आयुक्तालया मार्फत परीक्षा केंद्र निरिक्षक यांची नेमणूक करण्यात येत आहे. एकूण 76 सर्व परीक्षा केंद्रावर सिग्नल जॅमरची व्यवस्था करण्यात आलेली असून त्याच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर प्रवेश देतांना सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण स्कॅनिंग करून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच बायोमट्रीक तपासणी, डोळे स्कॅनिंग, फेस रिडींग होणार आहे. सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होवू नये या कारणास्तव सी.सी.टी.व्ही. च्या निगरानीखाली परीक्षा पार पाडल्या जाणार असून छायाचित्रणाचे पेनड्राईव्ह या आयुक्तालयास जतन केले जाणार आहे. परीक्षा केंद्रावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना परीक्षा केंद्रावर बंदोबस्त व वाहतूक सुरळीत रहावी या करिता या आयुक्तालय स्तरावरून सूचना व निर्देश देण्यात आलेल्या आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हयांमध्ये एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यरत आहेत. यापैकी ४४९ प्रकल्प ग्रामीण क्षेत्रात, ८६ प्रकल्प आदिवासी क्षेत्रात व १०४ प्रकल्प नागरी क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्व प्रकल्पाअंतर्गत राज्यात एकूण १ लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या सर्व अंगणवाडी केंद्रातील ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि 13 हजार 243 अंगणवाडी मदतनिस सर्व रिक्त पदे आयुक्तालय स्तरावरून भरण्यात येणार असून इच्छूकांनी मोठ्या संख्येने अर्ज करावे असे आवाहनही यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबईचे आयुक्त कैलास पगारे यांनी केले.

सर्व रिक्त पदे भरण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची सर्व रिक्त पदे पदे दि.३१ मार्च २०२५ पूर्वी भरण्यात येतील. राज्यातील बाल विकास प्रकल्प क्षेत्रातील इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवारांनी त्यांचे निवासी क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती नुसार अंगणवाडी सेविका व मदतनिस या पदाकरीता अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

15 फेब्रुवारी पर्यंतच मिळणार शास्तीत सवलत

Sat Feb 8 , 2025
– 5241 मालमत्ता धारकांनी लाभ घेतला   – ऑनलाईन पद्धतीने 50 टक्के तर ऑफलाईन पद्धतीने 45 टक्के सूट – सुटीच्या दिवशीही भरता येणार कर चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 50 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 45 टक्के शास्तीत सवलत देण्यात येत आहे.सवलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!