संदीप बलविर, प्रतिनिधी
– ग्रामपंचायत टाकळघाट चा उपक्रम
टाकळघाट :- टाकळघाट व परिसरातील विद्युत पुरवठा अखंडपणे कार्यरत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत टाकळघाट कडून आज दि १८ मार्च ला सत्कार करण्यात आला.
दिवस रात्र विद्युत पुरवठा सुरळीत रहावा व टाकळघाट येथील जनतेला कुठलाही त्रास सहन करावा लागू नये म्हणून सतत प्रयत्नरत राहणारे लाईन मेन हे खरोखरच सरकारचे मानकरी असल्याची जाणीव असल्याने त्यांच्या कार्याची कृतघ्नता बाळगुण टाकळघाट ग्रा प च्या सरपंच शारदा शिंगारे यांनी लाईनमेन दिनाचे औचित्य साधून या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आज दि १८ मार्च ला ग्रामपंचायत भवनाच्या दालनात केले होते.
यावेळी सर्व एम एस ई डी सी ल(महावितरण) अधिकारी व कर्मचारी यांचा ग्राम पंचायत टाकळघाट तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार मूर्ती म्हणून मुख्य कार्यकारी अभियंता, प्रफुल्ल लांडे (पाटील) उप-कार्यकारी अभियंता चरपे, सहाय्यक कार्यकारी अभियंता गाणार, सहाय्यक अभियंता नारुले , हेड लाईनमेन दयाल हनवते, हेमंत खंडाळकर, विशाल खोब्रागडे, त्रिपुरा, भोयर,पाटील,संजय कांबळे, लोकेश टेकाम, सुधीर सोनावणे, खुशाल नवघरे, मंगेश बजाईत, प्रफुल शिंगारे,आकांशा गोडघाटे, रितेश काळे, प्रतीक अंतावार,लकी मानकर, निलेश गोल्हर, अक्षय खंडारे, प्रेम सुपे, मोहित फुलझेले, आयुष कारमोरे, खुषाल नवले, सूरज हनवते आदी जण प्रामुख्याने होते.
या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगणा पंचायत समिती सभापती सुषमा कडू तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प टाकळघाट, च्या सरपंच शारदा शिंगारे उपसरपंच नरेश नरड,हे होते .या कार्यक्रमाला ग्रा प सदस्य मनोज जीवने,वर्षा डायरे, राजश्री पुंड, बबिता बहादुरे, सतीश कोल्हे, सुधा लोखंडे, वनिता चटप, रंजना झाडे, सूनंदा ठाकरे, सुनीता खोडे, देवानंद इरपाते सामाजिक कार्यकर्ता मनोहर खोडे, ग्रा.प.कर्मचारी व शेकडो नागरीक उपस्थितीत होते.