कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 20 :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून सरपंच तसेच सदस्यपदासाठी 122 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात एकूण 68 हजार 185 मतदारांपैकी 50 हजार 689 मतदारांनी मतदान केले असून या मतदानाची आज 20 डिसेंबर ला सकाळी 10 वाजेपासून कामठी तहसील कार्यालयाच्या मतमोजणी केंद्रावर मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून मतमोजणीनुसार 27 ग्रा प च्या 27 सरपंच पदासाठी 90 सदस्यातून 27 सरपंच तसेच 93 प्रभागातील 620 उमेद्वारातून 247 सदस्य निवडून आले.

मतमोजनि निकालानुसार खापा ग्रा प चे सरपंच पदाचे भाजप प्रणित उमेदवार आशा मदन राजूरकर विजयी झाले तसेच गुमथी ग्रा प चे सरपंच पदाचे भाजप प्रणित उमेदवार सीमा अविनाश मोरे विजयी,तर सुरादेवी ग्रा प निवडणुकीत सरपंच पदाचे भाजप प्रनोत उमेदवार मालाबाई बाबुराव झोडगे विजयी तर बिना ग्रा प निवडणुकीत भाजप प्रणित उमेदवार नारायण मोरबाजी भडंग विजयी,खसाळा ग्रा प निवडणुकीत सरपंच पदाचे भाजप प्रणित उमेदवार जयश्री धांनजय इंगोले विजयी झाले तर खैरी ग्रा प निवडणुकीत सरपंच पदासाठी कांग्रेस प्रणित उमेदवार योगिता किशोर धांडे विजयी झाले .भिलगाव ग्रा प सरपंच पदी कांग्रेसप्रणित भावना चंद्रकांत फलके विजयी झाल्या,रणाळा ग्रा प सरपंच पदी भाजप प्रणित पंकज साबळे विजयी झाले .तर येरखेडा ग्रा प मध्ये सरपंच पदी कांग्रेस प्रणित उमेदवार सरिता रंगारी निवडून आल्या तर 17 सदस्य पैकी 10 भाजप तर 7 कांग्रेस उमेदवार निवडून आले.आजनी ग्रा प सरपंच पदी भाजप प्रणित उमेदवार संजय जीवतोडे विजयी तर सोनेगाव ग्रा प सरपंच पदी कांग्रेसप्रणित मंदा विजय

शिंदेमेश्राम विजयी झाले,आवंढी ग्रा प सरपंच पदी कांग्रेस प्रणित जगदीश पौणिकर विजयी झाले तर भोवरी ग्रा प सरपंच पदी भाजपप्रणित उमेदवार ऋषी भेंडे निवडून आले .वडोदा ग्रा प सरपंचपदी कांग्रेस प्रणित उमेदवार राजू थोटे विजयी ,गुमथळा ग्रा प सरपंच पदाचे भाजप प्रणित उमेदवार प्रणाली डाफ विजयी, तर गादा ग्रा प सरपंच पदी भाजप चे सचिन डांगे विजयी झाले ,

भुगाव ग्रा प सरपंच पदी भाजपप्रणित उमेदवार नितेश घुबळे विजयी तर जाखेगाव ग्रा प सरपंच पदी कांग्रेस प्रणित उमेदवार भारती सचिन भोयर निवडून आले.आडका ग्रा प सरपंच पदाचे उमेदवार कांग्रेस प्रणित उमेदवार विजय खोडके विजयी झाले .केम ग्रा प सरपंच पदी कांग्रेस चे माजी उपसरपंच अतुल बाळबुधे विजयी झाले तर शिवणी ग्रा प सरपंच पदी भाजप चे माधुरी कोरडे विजयी झाले, कढोली ग्रा प सरपंच पदी भाजप प्रणित उमेदवार लक्ष्मण किसन करारे विजयी तर तरोडी बु सरपंच पदी भाजप प्रणित आरती प्रवीण चिकटे विजयी,परसाड ग्रा प सरपंच पदी कांग्रेस चे मनोज कुथे विजयी झाले तर लिहिगाव ग्रा प च्या सरपंच पदी भाजप व वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अस्मिता खांडेकर विजयी झाले तसेच कापसी बु सरपंच पदी कांग्रेस प्रणित उमेदवार तुळसा शेंदरे विजयी झाले.

मतमोजणी निकाल सुरळीत रित्या पार पडली असून या निकालात 27 ग्रा प मधून सरपंच पदी 17 भाजप तर 10 कांग्रेस प्रणित उमेदवार निवडून आले तसेच 93 प्रभागातून 247 सदस्य निवडुन आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर येथील विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन

Tue Dec 20 , 2022
नागपूर दि. २० : येथील विधिमंडळाच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.          […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com