निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांनी जिल्हा माध्यम संनियंत्रणासाठी माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यादव यांनी माध्यम कक्ष व सी-व्हिजील कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षाद्वारे इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत व समाजमाध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष लेख :विधानसभा निवडणूक २०२४,टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज....

Thu Oct 24 , 2024
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी, दिव्यांग तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com