संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी च्या उमेद्वारात थेट लढत होणार असले तरी महायुतीचे भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांची आधीच उमेदवारी जाहीर झाली असून ते 29 ऑक्टोबर ला जोरदार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत तर महाविकास आघाडीचे कांग्रेस चे उमेदवाराच्या प्रयत्नाला अखेर यश येत उमेदवार म्हणून मागील 2019 च्या निवडणुकीत निसटता पराभव झालेले माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नावाची वर्णी लागली असून ते 28 ऑक्टोबर ला थेट जोरदार प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.तर या विधानसभा निवडणुकीत दोन्ही उमेदवार आपपल्या पक्षात कार्यकर्त्यांत एक मोलाचे व महत्वपूर्ण प्रभावित व्यक्तिमत्त्व असले तरी या निवडणुकीत मागील 2019 च्या निडणुकीत कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर यांचा पराभव झाल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी कामठी विधानसभा मतदार संघाला दत्तक घेऊन सुरेश भोयर यांना सोबतीला ठेवून पूर्ण पाच वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहिले परिणामी सुरेश भोयर हे सत्तेवर नसले तरी पराभवाचा कुठलाही भाव त्यांना मनात आला नाही तर लोकप्रतिनिधींनी म्हणून नागरिकांच्या संपर्कात आले व पुनश्च उमेदवारी चा दावा ठोकला त्या दाव्याला माजी मंत्री सुनील केदार यांनी प्रतिष्ठा पणाला लावून तिकीट खेचून आणण्यात यश गाठले तर या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर अशी थेट लढत होत असली तरी वास्तविकता या निवडणुकीत उमेदवार सुरेश भोयर हे प्रत्यक्ष लढत असले तरी त्यामागील चेहरा हा माजी मंत्री सुनील केदार यांचा राहणार आहे त्यामुळे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध अप्रत्यक्ष सुनील केदार अशी लढत होताना दिसणार आहे.ही निवडणूक वर्चस्व व प्रतिष्ठेची होणार आहे असे असले तरी सोबतीला असलेले खासदार श्यामकुमार बर्वे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य व महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे त्यातच भाजप चे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची तिकीट कापुन खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आले असले तरी टेकचंद सावरकर समर्थकांत नाराजगीचा सुर सुरू आहे तसेच आत्मविश्वास नडु नये यासाठी ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी नवखी असल्यासारखी निवडणूक असल्याचे गृहीत धरून मोठ्या संख्येने मताधिक्य मिळावे यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. तर अजूनही वंचीत व बसपाने आपले उमेदवार जाहीर केले नाही हे इथं विशेष!या विधानसभा निवडणुकीची कामठी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी, मौदा व नागपूर ग्रामीण या तिन्ही तालुक्यातील गाव गल्लीत व शहरात चौका चौकात चहा टपरी वर विविध चर्चाना उधाण आले असून नागपूर ग्रामीण मतदार संघ तसेच कामठी शहर हे निर्णायक ठरणार आहेत हे इथं विशेष!
मतदार संघातील समस्या किती सुटल्या, किती समस्या जैसे थे याचा सरासर विचार करून जो पक्ष अथवा उमेदवार मतदार संघाच्या विकासाला हातभार लावण्यास सक्षम आहे त्याच्याच पारड्यात मत टाकण्याचा विचार मतदार करीत आहेत.त्यामुळे स्वतःला मतदारांचे ठेकेदार समजणारे गावपुढारी धास्तावले आहेत. कामठी विधानसभा मतदार संघातील चावडी,हॉटेल, बस स्थानकावरील कॉर्नर तसेच चहा टपऱ्या आणि चौका चौकात त्याच प्रमाणे गाव गल्लीत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत तर या निवडणुकीला आपले सुगीचे दिवस आले असे गृहीत धरणारे अति शहाणे पैसे कमविण्याची आपली व्युव्हरचना आखत आहेत .कोणता उमेदवार आपल्या मतदार संघाला न्याय देऊ शकेल ,राष्ट्रीय पातळीवर कुणाची सत्ता असायला हवी ,शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार अशा अनेक मुद्द्यावर चर्चा रंगत आहेत.या चर्चांमधून मतदारांचा कौल दिसिण्याऐबतच मतांचा निर्णयही लोक ठरवीत आहेत.आपल्याच पक्षाला मतदान कसे मिळेल याचे आराखडे बांधून गावपुढारी पक्षाकडे वजन वाढवत आहेत तर तसेच सर्वसामान्य जनतेला वेगवेगळी आमिषे दाखवून मतदान आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न जोमात सुरू झाला आहे .