कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न – मंत्री उदय सामंत

नागपूर :- महाराष्ट्राला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जमिनीवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य जयश्री जाधव यांनी शाहू स्मारक कधी पूर्ण होणार यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारावयाची जागा वस्त्रोद्योग विभागाच्या मालकीची आहे. सदर जागा कोल्हापूर महानगर‍पालिकेस हस्तांतरीत करण्याबाबत महानगरपालिकेकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शाहू मिलची जागा हस्तांतरीत झाल्यानंतर स्मारकाचा आराखडा आणि त्यासाठी आवश्यक निधी याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची ग्वाही दिली असून आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येऊन या कामाला गती देण्यात येईल, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भाचा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष दूर करणार - मत्स्यव्यसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा

Fri Dec 15 , 2023
नागपूर :- राज्यातील सर्वाधिक तलाव विदर्भात आहेत. मात्र, त्या तुलनेत मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष विदर्भातच जास्त आहे. हा अनुशेष तातडीने दूर करून विदर्भात मोठ्या प्रमाणात मत्स्यसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.14) आढावा बैठकीत दिली. सेमिनरी हिल्स येथील हरी सिंह सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा जलाशय येथे भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com