संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे चंद्रपूर-भद्रावती जि. चंद्रपुरात एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक दौऱ्यात, गोंड शासक खंडक्या बल्लाळशाहने बांधलेले महाकाली मंदिर, जे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे, कालांतराने महाकाली चंद्रपूरच्या गोंड राजांची प्रमुख देवता बनली. विद्यार्थ्यांनी चंद्रपुरातील अचलेश्वर मंदिर, अचलेश्वर प्रवेश द्वार, जेटपुरा गेट, श्री गुरुद्वारा गुरु सिंह सभा, दुसरी दीक्षाभूमी आणि गोंड राजा विरशाह यांच्या समाधीलाही भेट दिली. भद्रावती येथील विजयासन बौद्ध लेणी, सिद्धिविनायक गणेश मंदिर, भद्रनाग मंदिर, माँ भवानी मंदिर, जैन मंदिरांचा दौरा करतांना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ जितेंद्र सावजी तागडे यांना अनेक प्रश्न विचारले, उत्तरे देतांना त्यांनी भारतातील मंदिर स्थापत्य आणि भारतातील लेणी वास्तुकलेचा उगम आणि विकास याचे संदर्भ देऊन विद्यार्थ्यांची उत्सुकता शमवली.शैक्षणिक सहलीच्या सह-समन्वयक डॉ. निशिता अंबादे यांनी शैक्षणिक सहलीचे नियोजन आणि आयोजन करण्याच्या युक्त्या विद्यार्थ्यांना सांगितल्या.
शैक्षणिक सहलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण, उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवती, उपप्राचार्य डॉ.रेणू तिवारी, आय. क्यू. ए. सी समन्वयक डॉ.प्रशांत ढोंगळे व डॉ.अमोल गुजरकर यांनी सहकार्य केले. या शैक्षणिक सहलीत एकूण ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते.