नागपूर :- साईनगर हुडकेश्वर रोड येथील ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे अलीकडेच सहलीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये (एसी ग्रीन बस) ज्येष्ठांनी सहलीचा आनंद घेतला.
बृहस्पती मंदिर, केळझर, खडकी मारोती या ठिकाणी ही धार्मिक सहल काढण्यात आली. गाण्याच्या भेंड्या, भजन, एकपात्री नाटक, नकलांमध्ये ज्येष्ठांनी आपला दिवस आनंदात घालवला. तत्पूर्वी, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी डॉ. राखी खेडीकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, कालिंदी ढुमणे यांचा सत्कार हुडकेश्वर येथील साई मंदिरात करण्यात आला. यावेळी भाजप वैद्यकीय आघाडीच्या (महाराष्ट्र प्रदेश) डॉ. प्रिती मानमोडे, अध्यात्मिक आघाडी प्रमुख डॉ. श्रीरंग वऱ्हाडपांडे यांनी संवाद साधला. संचालन विलास सपकाळ यांनी केले. तर डोंगरदिवे यांनी आभार मानले.