– करवीर सोल्युशनचा स्तुत्य उपक्रम
नागपूर :- ज्ञान विज्ञान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत करवीर सोल्युशन नागपूरतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. करवीर संस्थेच्या अध्यक्ष छाया वझलवार यांच्या संकल्पनेतून गुलाब फुलाच्या पाकळ्यांची उधळन करून पर्यावरण पूरक होळीचा आनंद लुटण्यात आला.
संस्थेच्या सचिव सविता मंगळगिरी, चंद्रिका बैस, संजीवनी चौधरी, ज्योती धामोरीकर, माधवी सुपसांडे, रुपाली विक्टर, रेणू जोशी, सीमा शुक्ला, माया देशमुख, शालिनी मुदलियार, जुम्मा जाधव, तेजश्री मस्के, नेहा बिसेन, रजनी झाडे, सीमा गुप्ता, पूजा हांडे, राखी खोब्रागडे आदी सदस्या पर्यावरणपूरक होळीच्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन शीतल भिलकर यांनी केले.