ई-लायब्ररीमुळे समाजातील मुलांना होणार लाभ – ना.नितीन गडकरी

– मोमिनपुरा ई-लायब्ररीचे भूमिपूजन व गांधीसागर तलाव सौंदर्यीकरण

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे मोमिनपुरा भागात निर्माण होणाऱ्या ई-लायब्ररीमुळे परिसरातील मुलांना जगातील उत्तमोत्तम ज्ञान प्राप्त करता येणार आहे. या लायब्ररीच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा लाभ घेउन मुले भविष्यात डॉक्टर, अभियंता, वकील बनून नावलौकीक करतील. मोमिनपुरा ई-लायब्ररीमुळे समाजातील मुलांना मोठा लाभ मिळेल, असा विश्वास केंद्रीय परिवहन व महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेतर्फे मोमिनपुरा येथील अत्याधुनिक ई-लायब्ररी बांधकामाचे भूमिपूजन तसेच गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी (ता. ९) केंद्रीय परिवहन व महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

मोमिनपुरा येथील अत्याधुनिक ई-लायब्ररी बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोमिनपुरा भागामध्ये श्रद्धेय अटल बिहारी लायब्ररीच्या धर्तीवर अत्याधुनिक ई-लायब्ररी बनविण्यात येणार असल्याची माहिती दिली. मोमिनपुरा भागात ई-लायब्ररी निर्मितीसाठी पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी आमदार प्रवीण दटके यांचे देखील यावेळी विशेष अभिनंदन केले. परिसरातील जागेच्या बाबतीतील अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक आमदार विकास कुंभारे यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आणि नागपूर महानगरपालिकेचे देखील त्यांनी अभिनंदन केले. मुस्लीम समाजातील मुले ई-लायब्ररीतील सुविधांचा लाभ घेउन आपले ध्येय प्राप्त करून मोठे स्थान प्राप्त करतील, असा विश्वासही ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

जुना मोमिनपुरा लायब्ररी येथे आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून आमदार सर्वश्री प्रवीण दटके, विकास कुंभारे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी उपमहापौर जैतून अहमद, माजी स्थायी समिती सभापती कृष्णा कावळे, माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, कामील अंसारी, कार्यकारी अभियंता  राजेंद्र राठोड हे उपस्थित होते तर गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी मान्यवरांसह माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक प्रमोद चिखले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व त्यांनी शेवटी आभारही मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटींची कर हस्तांतरण

Thu Oct 10 , 2024
– भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालना – सणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्यांची रक्कम हस्तांतरित नवी दिल्ली :– महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले आहे. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com