– वायरलेस विभागाकडून राज्यातील एकमेव सत्कारमूर्ती.
वाडी डिफेन्स :– दौलामेटी, वाडी भागातील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या पुणे वायरलेस विभागात डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेले सुनील कुंभारे यांची त्यांच्या सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस महासंचालक पदकासाठी निवड करण्यात आली असून त्यांना 1 मे महाराष्ट्र दिवसाला पुरस्कार प्रदान ही करण्यात आला आहे.
सुनील कुंभारे यांना जाहीर झालेला हा पुरस्कार वायरलेस मुख्यालय पुणे चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या हस्ते मुख्यालयात सम्पन्न 1 मे महाराष्ट्र दिनी सम्पन्न झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.वाडी-नागपूर येथे शिक्षण पूर्ण केलेले सुनील कुंभरे यांनी आपल्या सेवेत अनेक उत्कृष्ट कामे केली आहेत.त्याची दखल घेत या पुरस्कारासाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या तर्फे निवड करण्यात आली.
सुनील कुंभारे यांना हे उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याच्या वृत्ताने त्यांच्या वाडी,दौलमेटी,डिफेन्स,नागपूर क्षेत्रातील परिचित व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.प्रा.सुभाष खाकसे,वसंत बांबरटकर,प्रज्ञा खाकसे,माला बांबर्टकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्राप्तीबद्दल सत्कार केला. तसेच वाडी पत्रकार संघाचे गजानन तलमले, विजय वानखडे ,डिफेन्स स्कुल मित्र परिवाराचे सदस्य अनिल लांडगे,चंदू जंगले, खुशाल हाडके, प्रमोद ढोके, अनिता खंडारे, सुजाता चवरे, मंदा पुसदकर, लता भगत, भीमराव फुसाटे, संजय वाहणे, सूर्यकांत खराबे, अहिंसक पाटील,मुकेश खाडे ,कल्पना पानतावणे, अनिता तांबे,कामिनी नवनागे, सरिता माने, संध्या नारनवरे, बागडे, माया पोटभरे, शोभा जंगले, हेमंत घागरे, विजय मधुमटके, अनिल रंगारी, शारदा बहादूर, दिलीप जवंजाळकर व शिक्षक सूर्यभान सांबरे आदींनी अभिनंदन केले आहे.