कोदामेंढी :- अरोली कोदामेंढी जि प क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अनेक रस्त्यांची हालत खस्ता झालेली असून चारचाकी ,दुचाकी वाहनधारक कमालीचे त्रस्त झालेले आहेत.चार चाकी चे ऑइल फिल्टर, तर दुचाकी चे पंचर होण्याचे प्रमाण वाढलेले असून मेंटेनन्सच्या खर्च वाढलेला आहे. याबाबत नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर अनेक वाहनधारकांनी व ठेकेदारांकडे काम करीत असलेल्या मजूर वर्गांनी सांगितले की, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच पंचायत समिती सदस्य ,जि प सदस्य हे सर्व लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून कमिशनची मागणी करत असून, ज्याप्रमाणे महागाई वाढत आहे ,ज्याप्रमाणे निवडणुकीच्या खर्च वाढत आहे, त्याप्रमाणे यांच्या कमिशनच्या शेकडेवारी 15% पासून ते पंचवीस टक्के पर्यंत वाढत असल्याने रस्त्यांच्या दर्जा सुमार होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या पहिला कोट पंधरा दिवसात तर दुसरा कोड 250 दिवस ही टिकत नसल्याने या क्षेत्रअंतर्गतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे.
भांडेवाडी ते सावंगी, अडेगाव ते कोदामेंढी, कोदामेंढी ते सुकळी, सुकळी ते सिरसोली, तांडा ते देवमुंढरी, यांसह इतरही रस्ते खस्तेहाल झालेले आहेत. सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत तर आता विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षातील नेते मंडळी या दोन्ही रस्त्यातून प्रचार करताना चार चाकी गाडीने फिरले. मात्र अजूनही या रस्त्यांना सुगीचे दिवस आलेले नाही, हे विशेष!