अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत डोंगर-दऱ्यांमध्ये पर्यटनाला घराबाहेर पडू नका, स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या..- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नदी, नाले, ओढे. धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगर, टेकड्या, दऱ्या, धबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणे, निसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यंस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये. दरडप्रवण, पूरग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, आवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेबरोबर सामंजस्य करार

Fri Jul 26 , 2024
मुंबई  :- आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड करण्यात आलेली आहे. याबाबतचा सामंजस्य करार 23 जुलै 2024 रोजी नागपूर येथे करण्यात आला आहे. मॅग्नेट प्रकल्पाच्यावतीने प्रकल्प संचालक विनायक कोकरे आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूच्यावतीने संचालक डॉ. दिलीप घोष यांनी करारावर स्वाक्षरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!