नागपूर :- मध्य नागपूरातील गाडीखाना येथील मैदानात २५ शाळेतील शेकडो विद्यार्थी व पालकांना निःशुल्क हेल्मेट वाटप कार्यक्रम आयसीआयसी लोंबड विमा कंपनी व प्रभास फाऊंडेशन याच्या संयुक्तपणे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अनिल आदमने यांनी यशस्वीपणे केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महिला काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र नाचन, बजाज मॅडम, विनोद अहिरकर, मुख्याध्यापक नंनार नेवारे,सुनिल ठाणेकर,सुरेश गोटेफोडे, डॅा.राजेश नाईक, विश्वनाथ डोर्लीकर,विश्वास क्षीरसागर आदि उपस्थित होते.
या हेल्मेट वाटप कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतांना ॲड. नंदा पराते यांनी रस्त्यावर वाहन चालवितांना वाहतूकीचे नियम पाळले तर दुर्घटना होणार नाही आणि कोणावरही वाईट परिस्थिती येणार नाही. रस्त्यावर वाहन चालवितांना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर केल्यास जीव धोक्यात येणार नाही.
रस्त्यावर वाहन चालवितांना आपल्या जिवाची सुरक्षितता राहावी म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमाने विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती करण्याचे कार्य होत असून त्यांना निःशुल्क हेल्मेट वाटप करण्यात आले आहे. प्रत्येकाने रस्त्यावर वाहन चालवितांना रस्ता सुरक्षा नियमांतचे पालन करावे असे ॲड. नंदा पराते यांनी आवाहन केले.
या हेल्मेट वाटप कार्यक्रमात गजानन ठाकरे, नितीन शिर्के,लक्ष्मण मस्के,होमराज तिडके,मनोज अहीरकर यांनी प्रमुख म्हणून अथक परिश्रम घेतले. या हेल्मेट वाटप कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल आदमने तर संचालन शुभांगी तिडके व आभार प्रदर्शन राजश्री आदमने यांनी केले.