संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तहसील कार्यालयात ये जा करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून नागरी हितार्थ काही वर्षांपूर्वी वसविण्यात आलेली थंड पेय पाण्याची मशीन ही तांत्रिकीय दृष्ट्या बिघाडीवर असल्याने या कडक उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेता नागरिकाच्या पिण्याची पाण्याची तृष्णा भागावी यासाठी काल 15 मे ला समाजसेवक अनंतलाल यादव तसेच समाजसेवक बबलू तिवारी याच्या सहकार्याने स्थापित थंड पेय पिण्याच्या पाण्याची मशीन पुनःश्च नव्याने बसविण्यात आली ज्याचे लोकार्पण विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान,उपविभागोय अधिकारी विराणी, तहसीलदार अक्षय पोयाम,नायब तहसिलदार राजीव बमनोटे, नायब तहसीलदार अमर हांडा, मुख्याधिकारी संदीप बोरकर,दानदाते अनंतलाल यादव व बबलू तिवारी तसेच भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल, लाला खंडेलवाल, श्यामलाल शर्मा,डॉ संदीप कश्यप, उज्वल रायबोले, जितेंद्र खोब्रागडे, गोल्डी यादव,यासह तहसील कार्यालयातील प्रस्तुतकार अमोल पौड, भुपेंद्र निमकर,गजेंद्र वंजारी, राम उरकुडे, सुधीर चव्हाण, कुंजीलाल पानतावणे आदी उपस्थित होते.