डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मदरसांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन

मुंबई :- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मदरसांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या मदरसांना डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना (Scheme for Providing Quality Education in Madrasa (SPQEM)) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना लागू राहणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संकेतला आरोपी करून गुन्हा दाखल करावा - सुषमा अंधारे

Thu Sep 12 , 2024
– न्यायालयात जाणार- सुषमा अंधारे नागपूर :- संकेत बावनकुळे हा लाहोरी रेस्टारेंटमध्ये मसाले दुध प्यायला गेला होता आणि त्याचे मित्र दारू प्यायला. मसाले दुध पिलेल्या व्यक्तीने आपल्या अडीच कोटींच्या गाडीची चावी प्रचंड दारू पिलेल्या मित्रांच्या हाती दिली. ही नव्हे काय? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणात संकेतला आरोपी करावे त्याच्यावर गुन्हा नोंदवावा. ते होणार नसेल तर मला वेगळी कायदेशिर प्रक्रिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!