डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई :- राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.

सातारा येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे प्राचार्य असलेल्या डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, त्या दिवसापर्यंत असेल.

सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील, पुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नीट परीक्षा में धांधली के विरोध में कांग्रेस का प्रदर्शन

Fri Jun 14 , 2024
– चितारओली चौक पर मध्य नागपुर कांग्रेस कमेटी का धरना आंदोलन नागपूर :- नीट परीक्षा में हुई धांधली के विरोध में गुरुवार को मध्य नागपुर कांग्रेस कमेटी की ओर से सेंट्रल एवेन्यू पर चितारओली चौक स्थित महात्मा गांधी की प्रतिमा के समक्ष धरना आंदोलन कर सरकार का ध्यानाकर्षित किया गया. नीट परीक्षा में धांधली कर लाखों विद्यार्थियों के साथ जो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com