नागपूर, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले