पुणे :- ऐरवी ‘फ्री बी’ योजनांचा गोंगाट करीत दुसऱ्या राजकीय पक्षांच्या धोरणावर टीका-टिप्पणी करणारे, आता राजकीय फायद्यासाठी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त भेटवस्तू देणार आहेत.पंरतू,अल्पसंख्याकांना ‘सौगात-ए-मोदी’ नको; रोजगार द्या, असे आवाहन बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.२७) केले.अन्नपदार्थ, कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा, साखर, महिलांसाठी सलवार सूट आणि पुरूषांसाठी कुर्ता-पायजामासाठीचे कापड असलेले किट वाटपासाठी देशभरात मोठमोठे एव्हेंट सत्ताधारी पक्ष करणार आहे.
कार्यक्रमांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक आणि बहुजनांबद्दल सत्ताधारी पक्षाकडून आपुलकीच्या भावनेचा आव आणत त्यांच्या बद्दल कधीही नसलेले प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दावा डॉ.चलवादी यांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीकडून आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्नात आहे.मात्र, केवळ किट वाटप करून चालणार नाही, तर सत्ताधाऱ्यांना अल्पसंख्यांक तसेच बहुजनांबद्दल त्यांच्या मनात असलेले भेद,राग दूर करावा लागेल, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी देखील सत्ताधारी पक्षाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला आहे. ईद, बैसाखी, गुड फ्रायडे, ईस्टर निमित्त ३२ लाख गरीब अल्पसंख्यांक परिवारांना ‘सौगात-ए-मोदी’ रुपात पंतप्रधानांचा प्रेम संदेश आणि भेट पोहचवण्याची घोषणा केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचे मत मायावती यांनी व्यक्त केले आहे. मुस्लिम आणि बहुजन समाज आपली जीवित, मालमत्ता आणि धर्माच्या सुरक्षेबाबत दुःखी आणि चिंतित असतांना अशा किट चा काय फायदा? असा सवाल बहनजींनी उपस्थित केला असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारांनी मुस्लिम तसेच इतर धर्मातील अल्पसंख्यांक गरीब कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी’ देण्याऐवजी हलाखीची गरीबी, बेरोजगारी आणि मागासलेपणा दूर करण्यासाठी रोजगाराची कायमची व्यवस्था केली असती आणि त्यांच्या सुरक्षेवर योग्य लक्ष दिले असते, तर बर झाले असते, अशी भूमिका पक्षाची असल्याची माहिती डॉ.चलवादी म्हणाले.