एचएमपीव्ही’ विषाणूबाबत भीती बाळगू नका,आवश्यक दक्षता घ्या – विभागीय आयुक्तांचे आवाहन

नागपूर :-  ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) हा एक सामान्य विषाणू आहे ज्यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्ग होतो. या संसर्गापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी यासंदर्भात नाहक भीती बाळगू नये असे सांगितले आहे.

हा हंगामी रोग असून हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातील सामन्यत: आरएसव्ही आणि फ्लू प्रमाणे उद्भवतो. सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या आजाराचे रुग्ण वाढले, अशा बातम्या येत आहेत. हा आजार तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळला.

खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्याचे नागपूर विभागातील नागरिकांनी पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, नाक वाहणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.

*हे करा* :-

• जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यूपेपरने झाका.

• साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

• ताप,खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

• भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.

• संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन ( व्हेंटिलेशन) होईल याची दक्षता घ्या.

*हे करू नका* :-

• हस्तांदोलन करु नये.

• टिश्यु पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका.

• आजारी लोकांशी जवळचा संपर्क ठेवू नका.

• डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.

• सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

• डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय उपचार घेऊ नका.

सर्दी-खोकला अर्थात आयएलआय,सारी रुग्णांसंदर्भात आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात येत असून अशा रुग्णांनी तत्काळ वैद्यकीस सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. तसेच एचएमपीव्ही या आजाराबाबत घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याबाबत विभागीय आयुक्तांनी आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर

Tue Jan 7 , 2025
मुंबई :-राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. 6) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा 51 वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला. लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२3 या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 4790 नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला 4583 प्रकरणे प्रलंबित होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!