डॉगा रुग्णालयाचा अभिनव उपक्रम सिकलसेल कार्यशाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर दि.21 : 11 ते 17 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात सिकल सेल सप्ताहाचे आयोजन डागा स्त्री व बाळ रुग्णालयात करण्यात आले होते. सप्ताहादरम्यान सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धा, तपासणी व जनजागृती शिबीर, ऑनलाईन वेबिनार व कार्यशाळा आदीचे कार्यक्रमाचे उदघाटन डॉगा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सिमा पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्कस डॉ. माधुरी थोरात, बालरोग तज्ञ डॉ. विनिता जैन, डॉ. राजरत्न वाघमारे, सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी, संजीवनी सातपुते, प्रचिती वाळके, निलकंठ पांडे, संजीव गजभिये, गौतम डोंगरे, प्रीती नगरारे,उपस्थित होत्या.

सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्यावेळी जेनेटीक बदलामुळे होतो. तसेच रक्तदोषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या शेवटपर्यंत सोबत राहतो. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा होतो. आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख असणाऱ्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 11 ते 17 डिसेंबर दरम्यान नियंत्रण सप्ताह राबविण्यात आला.

            जिल्ह्यात सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, डागा स्त्री रुग्णालय स्तरावर करण्यात आले. यात सिकलसेलची प्राथमिक तपासणी (सोल्युबिलीटी चाचणीची) मोफत तपासणी करण्यात आल्या व तपासणीमध्ये सकारात्मक येणाऱ्या रक्त नमुण्याची इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी व आवश्यकतेनुसार HPLC तपासणीही करण्यात आली. जनजागृती करण्याकरीता सिकलसेल कार्यशाळा, रॅली, पोस्टर मेकींग स्पर्धा व रांगोळी स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते.

            या शिबिरामध्ये सिकलसेल आजाराबाबत उपचार, प्रसार व प्रतिबंध याबाबत माहिती देण्यात आली. प्रसुतीपूर्व गर्भजल निदान तपासणीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा 96 व्यक्तींनी लाभ घेतला.  तसेच सिकलसेल तपासणी व मार्गदर्शन शिबीर  जिल्हा परिषद, नगर परिषद, माध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक विद्यालय कळमेश्वर व डागा स्त्री व बाल रुग्णालय येथे करण्यात आले होते. त्यात एकूण 674 तपासण्या करण्यात आल्या असून 23 रक्तनमुने सकारात्मक आले असून त्यांचे इलेक्ट्रोफोरॉसिस रिपोर्टमध्ये 22 वाहक व एक रुग्ण आढळून आले.  मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

            डागा स्त्री रुग्णालयात डे केयर सेंटर सिकलसेल रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असून या सेंटर मार्फत सर्व वाहक व रुग्ण यांना विवाहपूर्व कुटुंब नियोजन नियमित उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत समुपदेशन व औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, खेर यांची 'कू' वर इमोशनल पोस्ट काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर

Tue Dec 21 , 2021
 डिसेंबर, 2021: आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला ‘काश्मिर फाइल्स’ या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे. अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com