अंबाझरी धरण बळकटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी गतीने पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

नागपूर :- अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व कामे पावसाळ्याआधी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची सहावी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस बिदरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार , मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी , उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्यासह महामेट्रोरेल, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी हाती घेण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयाद्वारे समितीने सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांना केल्या आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यातील कामानंतर दुसऱ्या टप्प्या अंतर्गत या धरणाच्या जवळपास 42 हजार क्युबिक मीटर वर मातीबांध बळकटीकरणाचे कामे अंतिम टप्प्यात असून ही कामे पावसाळ्याआधीच पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती बिदरी यांनी जलसंपदा विभागाला दिले.

अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे. पुलाचे बांधकाम करतांना वीज वाहिन्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी समन्वयाने पूर्ण करावीत. ही कामे पावासाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने नियोजन करावे. याठिकाणी वाहतूकीच्यादृष्टिने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

धरणाच्या प्रवाहाला अडथडा निर्माण करणारी अतिक्रमन तातडीने काढणे, परिसरातील नाग नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे, नाले सफाई आदी कामांनाही वेग देऊन पावसाळ्यापूवी्र पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येत असून या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे उच्च न्यायालयाला नियमितपणे सादर करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छात्रवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी

Wed May 15 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- मराठा सेवा संघ कन्हान व्दारे छात्रवीर, छत्रपती राजे संभाजी महाराजांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. मंगळवार (दि. १४) मे २०२४ ला तारसा रोड कन्हान येथील मराठा सेवा संघ कार्यालयात छात्रवीर, छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस मराठा सेवा संघ कन्हान अध्यक्ष शिवश्री ताराचंद निंबाळकर, समन्वयक शिवश्री शांताराम जळते, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, संभाजी ब्रिगेड कन्हान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!